समाजसुधारक गाडगेबाबांनी समाजापुढे श्रमाचा आदर्श ठेवला-माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा
जनसंपर्क कार्यालयात संत गाडगेबाबा जयंती निमित्त अभिवादन कार्यक्रम संपन्नखामगाव :-थोर संत समाज सुधारक वैराग्यमुर्ती संत गाडगेबाबा यांनी समाजातील अज्ञान, अंध्ाश्रध्दा,जातीभेदचे उच्चाटन करण्यासाठी आपले संपुर्ण आयुष्य वेचले.गाडगे महाराजांनी किर्तनाच्या माध्यमातून स्वच्छतेबाबत जनजागृती केली. चोरी करु नये, देवधर्माच्या नावावर मुक्या प्राण्यांचे बळी घेवू नये, आई-वडीलांची सेवा करावी,भुकेल्यांना अन्न द्यावे असे उपदेश करुन किर्तनाच्या माध्यमातून सहज व सोप्या शब्दातुन स्वच्छतेतून समृध्दीकडे जाण्याचा मुलमंत्र देवुन समाज सुधारक गाडगेबाबांनी समाजापुढे श्रमाचा आदर्श ठेवला असे प्रतिपादन माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी केले. दि.23 फेब्रुवारी 2024 रोजी कर्मयोगी संत गाडगे बाबा यांची जयंती जनसंपर्क कार्यालय येथे उत्साहात साजरा करण्यात आला त्यावेळी बोलतांना त्यांनी उपरोक्त प्रतिपादन केले.
![]() |
Advt. |
यावेळी खामगाव तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोज वानखडे, कृ.उ.बा.स.चे सभापती , माळवंदे,माजी नगरसेवक किशोरआप्पा भोसले,माजी नगरसेवक शेख फारुख बिसमिल्ला, आनंद परदेसी,काँग्र्रेस अल्पसंख्याक सेलचे शहर अध्यक्ष बबलु पठान आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलतांना माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा म्हणाले की,संत गाडगे महाराजांनी जनकल्याणाची अनेक कामे केली. त्यांचे विचार हे समाजासाठी अत्यंत मौलीक होते. त्यांनी दाखविलेल्या आदर्श मार्गावर सर्वांनी मार्गक्रमण करुन संघ्ाटनेच्या माध्यमातून समाजातील दिन,दलीतांच्या सेवेसाठी कार्य करावे असे सांगुन त्यांनी उपस्थितांना संत गाडगेबाबांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या. सर्वप्रथम संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.तद्नंतर उपस्थित मान्यवरांनीही पुष्प अर्पण करुन जयंतीनिमित्त अभिवादन केले. यावेळी कर्मयोगी गाडगे महाराज की जय,गोपाला-गोपाला देवकीनंदन गोपाला, अश्या घ्ाोष्ाणा देण्यात आल्या.कार्यक्रमाचे संचालन माजी नगरसेवक किशोरआप्पा भोसले यांनी तर आभार प्रदर्शन खामगाव तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोज वानखडे यांनी केले.
या कार्यक्रमाला वाडी ग्राम पंचायतचे सरपंच विनोद मिरगे, पिंप्री गवळीचे सरपंच शेषराव गोरे, माजी पंचायत समिती सदस्य गणेश मुळे, हाफीज साहेब, दिलीप मुजुमले, तहेसीन शाह, शेरु चौधरी, प्रशांत भाकरे,तुषार राणा,, मनोहर हागे,राजु बटवाडे यांच्यासह कॉंग्रेसचे पदाध्ािकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
Post a Comment