वंचित बहुजन आघाडीच्या वतीने माता रमाई जयंती साजरी
खामगाव प्रतिनिधी: महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रेरणा त्यागमुर्ती माता रमाबाई आंबेडकर यांची जयंती वंचित बहुजन आघाडीच्या वतीने साजरी करण्यात आली. स्थानिक वंचित बहुजन आघाडीच्या मध्यवर्ती कार्यालयात ७ फेब्रुवारी रोजी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष गणेशभाऊ चौकसे यांच्या हस्ते माता रमाई यांच्या प्रतिमेचे पूजन करून हारारपण करण्यात आले.यावेळी पश्चिम विदर्भ उपाध्यक्ष शरद वसतकार,बाजार समिती उपसभापती संघपाल जाधव, सेवक सभापती राजेश हेलोडे, ॲड.मंदिपसिंग शीख, रुपाली विजय तायडे, उद्धव मोरे, शाहीर गोविंदा हिवराळे, दीपक महाजन, गणेश इंगळे, सुमित छापरवाल, नाना वाकोडे, किसन तायडे, विजय तायडे, किरण छापरवाल उपस्थित होते.
Post a Comment