" द कॉन्स्टिटयूशन अँड युनिटी ऑफ इंडिया " या राष्ट्रीय कॉन्फेरंसचे कर्नाटक सरकारच्या वतीने बंगलोर येथे दिनांक 24 व 25 फेब्रुवारी रोजी आयोजन

उद्योजक गौतम गवई यांनाही निमंत्रण



खामगाव - भारतीय संविधान,भारतीय लोकशाही, विविध स्वायत्त संस्था यावर सातत्याने हल्ले होत आहेत. लोकशाहीची चौकट धोक्यात आली आहे. त्यामुळे संबंध भारतीयांचे अधिकार व हक्कावर गदा आली आहे. या परिस्थितीशी लढण्यासाठी आणि लोकशाही मूल्ये व मानवतावाद टिकविण्यासाठी सामाजिक न्याय मंत्रालय कर्नाटक सरकार ने बंगलोर येथे दिनांक 24 व 25 असे दोन दिवशीय " द कॉन्स्टिटयूशन अँड युनिटी ऑफ इंडिया " या राष्ट्रीय कॉन्फेरंस चे आयोजन केले आहे. देशभरातील  नामवंत विद्वान, विविध क्षेत्रातील अभ्यासक, तत्ववेत्ते या कॉन्फरंस  मध्ये आपापले विचार मांडणार आहेत. खामगाव येथील उद्योजक, काँग्रेस पक्षाचे प्रदेश अ जा सरचिटणीस तथा प. विदर्भ अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरम यांनाही या कॉन्फरन्सचे निमंत्रण आले असून ते या परिषदेत सहभागी होणार आहेत. कर्नाटक सरकारचे सामाजिक न्यायमंत्री मा. एच. जी. महादेवाप्पा यांच्या स्वाक्षरीने गौतम गवई यांना निमंत्रण पाठवले आहे.


दि.24 आणि 25 फेब्रुवारी असे दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेत भारतीय राज्य्घटना, त्यातील तत्वे, लोकशाही, समाजवाद, , सामाजिक व आर्थिक समानता, सर्वसमावेशकता इत्यादी विषयावर चिंतन होणार आहे. दोन दिवसात एकूण 20 परिसंवाद होणार आहेत. आणि प्रत्येक परिसंवादात 4 ते 5 प्रमुख अभ्यासक - विद्वान आपापले विचार व्यक्त करणार आहेत आणि त्यानंतर देशभरातून आलेले डेलिगेट्स त्यावर आपापले अनुभव -  वस्थूस्थिती मांडणार आहेत.

कॉन्स्टिटयूशन अँड डेमोक्रसी इन द 21 सेंच्यूरी, इन्शुरिंग ऐक्वालिटी अँड इक्वीटी, रिफर्मीन्ग इंडियाज फेडरेल डिझाईग, कॉन्स्टिटयूशनल प्रॉमिस अँड इंडियाज डेव्हलोपमेंट, फंडामेंटल राईट्स डायरेक्टिव्ह प्रिन्सिपलं अँड सिटीझन, सोशियल अँड इकॉनॉमिक जस्टीस, इन्स्टिटयूशनल सेफगार्ड अँड डेमोक्रसी असे विविध परिसंवाद होणार आहेत. या परिषदेचे आयोजन कर्नाटक सरकार सामाजिक न्याय विभाग यांनी केले असून प्रमुख वक्ते व सहभागी सर्व देशभरातील डेलीगेट्स यांचा संपूर्ण प्रवास खर्च, विमानाची तिकिटे, ट्रेन चे 2 टायर तिकिटे तसेच हॉटेल निवास खर्च कर्नाटक सरकारने दिला आहे. या परिषदेत संपूर्ण विदर्भातून गौतम गवई हे एकमेव डेलीगेट्स म्हणून आपले विचार दिनांक 24 फेब्रुवारी रोजी 4:30 च्या सत्रात मांडणार असून त्यासाठी दि.24 फेब्रुवारी रोजी सकाळी  नागपूर विमानतळावरून बंगलोर येथे जाणार आहेत. या परिषदेत सहभागी होण्यासाठी गौतम गवई यांना हितचिंतकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post