जेसीआय खामगाव जय अंबे 2024 चा पदग्रहण सोहळा थाटामाटात संपन्न
खामगाव शहरातील नामांकित सामाजिक संस्था जेसीआय खामगाव जय अंबे च्या 2024 या वर्षाच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीचा शपथ व पदग्रहण सोहळा 13 फेब्रुवारी 2024 ला हॉटेल हायवे ग्लोरी येथे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला
मावळते अध्यक्ष जेसी कौस्तुभ मोहता यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीची सुरुवात करण्यात आली यावेळी मंचावर मुख्य अतिथी अमरावती येथील प्रसिद्ध उद्योजक जेसीआय इंडियाचे माजी उपाध्यक्ष जेसी नरेंद्रजी बरडिया, जेसीआय झोन१३ चे प्रेसिडेंट जेसी प्रतीक सारडा, झोन व्हाईस प्रेसिडेंट जेसी गौरव डाकराव, जेसी डॉ भगतसिंग राजपूत, जेसी डॉ शालिनी राजपूत, जेसी एडवोकेट रितेश निगम, जेसी योगेश खत्री, जेसी देवांशी मोहता उपस्थित होते. सर्वप्रथम खामगावची मोठी आई अंबामातेच्या समोर दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यानंतर जेसीआय चे विजन, मिशन एवं मूल्याचे वाचन जेसी ऋषिकेश डिडवाणीया यांनी केले यानंतर सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन स्वागत करण्यात आले. तत्पश्यात 2023 चे अध्यक्ष कौस्तुभ मोहता यांनी आपल्या कार्यकाळातील केलेल्या प्रकल्पांची माहिती देत आपले मनोगत व्यक्त केले व त्यांनी आयपीपी म्हणून नवीन पदभार स्वीकारला. 2023 चे आयपीपी जेसी एडवोकेट रितेश निगम यांचे पूर्वाध्यक्ष क्लब मध्ये स्वागत जेसी डॉ शालिनी राजपूत यांनी केले.
यानंतर 2024 चे नवनियुक्त अध्यक्ष जेसी डॉ गौरव गोयनका यांना अध्यक्ष पदाची शपथ घेतली व जेसी कॉलर, जेसी गॅवेल आणि जेसी पिन यांचा स्वीकार केला. यावेळी जेसी डॉ गौरव गोयनका यांनी नवनियुक्त सचिव जेसी एडवोकेट दिनेश वाधवाणी, कोषाध्यक्ष जेसी अपूर्व देशपांडे, ज्युनिअर जेसी शार्वी अभय अग्रवाल, फर्स्ट लेडी जेसी डॉ कोमल गोयनका यांना मंचावर आमंत्रित केले तसेच 2024 ची नवीन कार्यकारिणीची घोषणा करून अध्यक्षांनी सर्व सदस्यांना पदाची शपथ दिली. याच कार्यक्रमात झेडवीपी जेसी गौरव डाकराव यांनी जेसीआय खामगाव जय अंबे मध्ये याच वर्षी नवीन आलेल्या सदस्यांचा ज्यामध्ये जेसी करण डिडवाणीया, जेसी पूर्वा डिडवाणीया, जेसी आशिष मोदी, जेसी सुरभी मोदी, जेसी विशाल गांधी, जेसी निष्ठा पुरवार जेठानी, जेसी दिव्या बरालिया, जेसी हर्ष मुनोत, जेसी डॉ उज्वला पवार, जेसी आकाश बुधवानी, जेसी विनय मोहनानी या सर्वांचे शपथ देऊन संस्थेमध्ये स्वागत केले.
![]() |
Advt. |
यानंतर सर्व प्रमुख अतिथींनी उपस्थित सदस्याना मार्गदर्शन केले 2024 चे नवनिर्वाचित अध्यक्ष जेसी डॉ गौरव गोयनका यांनी जेसीआय खामगाव जय अंबे च्या माध्यमातून सर्व जेसी सदस्यांचे तसेच शहरातील नागरिकांसाठी पर्सनल डेव्हलपमेंट ट्रेनिंग चे विविध शिबिर जेसीआय इंडिया चे देशभरातील प्रमुख ट्रेनर यांच्याद्वारे घेण्यात येतील व तसेच इतरही अनेक समाजोपयोगी कामे करण्याचे मनोगत व्यक्त केले. याची सुरुवात म्हणून खामगाव शहरातील प्लास्टिकचा वापर कमी व्हावा यासाठी ज्या जुन्या मिनरल वॉटर च्या प्लास्टिक बॉटल आपल्याकडे असतील त्यामध्येच किंवा संस्थेद्वारे आपल्याला दिल्या जाणाऱ्या प्लास्टिक बॉटलमध्ये घरात बाहेरून येणारे प्लास्टिक पॉलिथिन, चॉकलेटचे रॅपर, पॅकिंग फूड्स चे रॅपर इत्यादी सर्व प्रकारचा कचरा त्या बॉटलमध्ये भरावा व ती प्लास्टिक बॉटल भरल्यानंतर जेसीआय खामगाव जय अंबे च्या कोणत्याही सदस्याला कॉल केल्यास ती बॉटल आम्ही रीसायकल करण्याकरिता पुढे पाठवून देण्याची व्यवस्था करू जेणेकरून आपल्या शहरात रस्त्यात, नालीमध्ये, उघड्यामध्ये प्लास्टिक न फेकता ते प्लास्टिक कोणत्याही गौमाते सारख्या व इतर जनावरांनी खाऊन त्यांचा जीव जाऊ नये तसेच जमिनीचे नुकसान होऊ नये, नाल्या चोकअप होऊन सर्वसामान्य नागरिकांना त्याचा त्रास होऊ नये अशी भावना व्यक्त केली.
यावेळी आभार प्रदर्शन नवनियुक्त सचिव जेसी एडवोकेट दिनेश वाधवानी यांनी केले. मंचाचे संचलन जेसी डॉ अनुप शंकरवार जेसी रचना बयस सलूजा यांनी केले व यानंतर राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.यावेळी जेसी रोहन जैस्वाल, जेसी हेतल वाधवाणी, जेसी डॉ आनंद राठी, जेसी डॉ प्रतिमा राठी, जेसी डॉ गौरव लढ्ढा, जेसी डॉ श्रुती लढ्ढा, जेसी राहुल नोतानी, जेसी मंगेश राऊत, जेसी गजानन जोशी, जेसी कुणाल भिसे, जेसी कोमल भिसे, जेसी अमोल घवाळकर, जेसी पुनम घवाळकर, जेसी डॉ कश्यप जैस्वाल, जेसी रश्मी जैस्वाल, जेसी डॉ चेताश्री शंकरवार, जेसी सोनाली टिंबाडिया, जेसी निखिल लाटे, जेसी नम्रता लाटे, जेसी दिव्या अग्रवाल, जेसी मधुर अग्रवाल, जेसी श्वेता अग्रवाल, जेसी सुरभी गोयनका, जेसी सुशांत राज घवाळकर, जेसी रुपाली घवाळकर, जेसी सुनील राठी सह शहरातील गणमान्य नागरिक उपस्थित होते.
Post a Comment