DCB बँक शाखा कडून प्रजाक सत्ताक दिना निमित्त रक्तदान

खामगांव :- रक्ताचा तुटवडा येथील सामान्य रुग्णालयात निर्माण झाल्यामुळे वैद्यकीय अधीक्षक डॉ. निलेश टापरे यांनी रक्तदान करण्याचे आवाहन केले होते त्या आवाहन स्वीकारून DCB बँक शाखा खामगांव कडून प्रजाक सत्ताक दिनाचे औचित्य साधून दिनांक 25 जानेवारी रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन निता वर्मा मॅम ब्रँच मॅनेजर DCB बँक यांच्या कडून करण्यात आले होते.


तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एकनिष्ठा गौ - सेवा रक्तसेवा फाउंडेशन संस्थापक सुरजभैय्या यादव यांच्या हस्ते या शिबिराचे उदघाट्न करण्यात आले होते आपल्या भारत देशाच्या रणभूमीवर जाऊन प्रत्येकाला रक्त सांडणे शक्य नाही आहे तर आपण सर्व भारतीय देशाचे शिपाई आहोत सहज तेवढेच पुण्य आपण गरजू रुग्णांना रक्तदान करून जिवनदान देऊन हे पुण्य करू शकतो व रक्तदान करण्याचे फायदे सुद्धा काय आहे याची माहिती सुद्धा उपस्थित रक्तदात्यांना यादव यांनी दिली यावेळी DCB बँकच्या कर्मचाऱ्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपत रक्तदानास पुढाकार घेत रक्तदात्यांनी विर जवानांना श्रद्धांजली रक्तदान करून दिली. या उपक्रमात रोहन देशमुख, अमोल टिकार, रुपेश शर्मा, शुभम कोल्हे, संतोष रहाटे, दिपक सिंग, कु. राठी, जितु गोयल, महादेव वाडेकर, ओम सिंघानिया, प्रशांत वरघंटे, लोकेश अग्रवाल, अनंता मानकर, गणेश डोबे, किरण राठोड, किशोर मिरचंदानी, किशोर अवचार, गौरव सपकाळ, यश देशमुख आदि लोकांनी सामाजिक बांधिलकी जपून प्रजाक सत्ताक दिन शहीद विर जवानांना रक्तदान करून श्रद्धांजली दिली. व तसेच शासकीय रक्तपेढीचे रक्तसंक्रमण अधिकारी सौ. प्रणाली देशमुख, श्री. विष्णु मुंडे, परिचारीका सौ. काळे, कर्मचारी अशोक पराते, कु. वैष्णवी वानखडे, कु. नेहा रहाटे यांचे सहकार्य लाभले या उपक्रमा मध्ये कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहन देशमुख यांनी केले तर DCB बँक शाखा खामगांव ब्रँच मेॅनेजर निता वर्मा यांनी रक्तदात्यासह सर्व मान्यवरांचे बुके व गिफ्ट देऊन आभार मानले. अशी माहिती अमोल टिकार यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

Post a Comment

Previous Post Next Post