जयहिंद लोकचळवळीच्या वतीने राजमाता जिजाऊं आणि  स्वामी विवेकानंद यांना अभिवादन


खामगाव : जयहिंद लोकचळवळीच्या वतीने राजमाता जिजाऊं आणि  स्वामी विवेकानंद यांना  १२ जानेवारी रोजी जयंती दिनी अभिवादन करण्यात आले. जयहिंद लोकचळवळीच्या खामगाव कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी मान्यवरांनी जिजाऊ आणि  स्वामी विवेकानंद  यांच्या कार्याची माहिती उपस्थितांना दिली.

गरिब रयतेच्या सुखासाठी स्वतंत्र स्वराज्य बनवावे ही राजमाता जिजाऊंची इच्छा होती. आपल्या माँसाहेब जिजाऊ यांनी स्वराज्याचे स्वप्न बघितले आणि ते सत्यात देखील उतरविले. भारतीय पुराणांमध्ये आदिशक्तीचा उल्लेख हा केलेला दिसतो. या आदिशक्तीचे दर्शन सर्व जगाला राजमाता जिजाऊंच्या रूपाने घडले.  शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज असे दोन  छत्रपत्री घडविणाऱ्या जिजाऊ जगातील आदर्श मातृत्व आहेत, असे विचार मांडत जयहिंद लोकचळवळीचे बुलडाणा जिल्हा समन्वयक स्वप्नील ठाकरे पाटील यांनी जिजाऊंना अभिवादन केले.तसेच  स्वामी विवेकानंद यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकताना स्वप्नील ठाकरे पाटील म्हणाले की, जगातील सर्व धर्म एकच आहेत. ज्ञान आणि शक्ती दोन्ही आवश्यक आहेत. स्वतःवर विश्वास ठेवा, तर जग तुमच्यावर विश्वास ठेवेल असे स्वामी विवेकानंद यांचे विचार होते . स्वामी विवेकानंद यांचे  विचार आजही आपल्याला मार्गदर्शन करतात आणि आपल्या आयुष्याला अर्थ देतात. त्यांची अचल श्रद्धा आणि जिद्द आपल्या सर्वांसाठी प्रेरणा आहे.असेही स्वप्नील ठाकरे पाटील म्हणाले.

यावेळी जिजाऊ वंदना पठण करण्यात आली. तसेच  राजमाता जिजाऊं आणि  स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले   कार्यक्रमास जयहिंद लोकचळवळीचे बुलडाणा जिल्हा समन्वयक स्वप्नील ठाकरे पाटील, सुमित बेद्रे, श्रीधर ढगे,  रुपेश पाकदाने, गजानन देवचे, श्रीनाथ पांडे, रणजीतसिंग सलूजा,  नितीन पाटील, संजय खराटे,  गोविंदा ठाकरे,  संतोष चांदुरकर , पंकज घोगले  विलास नवसागर, लोमेश भोयर, वैभव लाहुडकार, अनिल ठाकरे यांच्यासह जय हिंद चळवळीचे कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन श्रीधर ढगे तर आभार सुमित बेद्रे यांनी मानले. 

Post a Comment

Previous Post Next Post