निरंकारी सदगुरू माता सुदीक्षाजी यांचे अकोट येथे बुधवारी प्रवचन
*खामगांव(तालुका प्रतिनिधी)*संत निरंकारी मिशनच्या प्रमुख सदगुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्या अमृततूल्य प्रवचनाचा कार्यक्रम ३१ जानेवारी बुधवारला स्थानिक कृषि उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात सायंकाळी ५ ते ८ दरम्यान होत असून या सत्संग सोहळ्याला परिसरातील भाविकांनी बहुसंख्येने हजर राहावे, असे आवाहन संत निरंकारी मंडळ अकोट शाखेचे प्रमुख सतरामदास पारवाणी यांनी केले आहे.
दरम्यान स्थानिक अकोट कृषि उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणामध्ये होत असलेल्या निरंकारी संत समागमामध्ये सद्गुरू माता सुदीक्षाजी यांच्या समवेत त्यांचे पती निरंकारी राजपिता रमीतजी हे देखील उपस्थित राहणार आहेत. या सत्संग सोहळ्याला किमान पाच हजारावर भाविक उपस्थित राहतील, ज्यामध्ये खामगांव तथा बुलडाणा जिल्ह्यासह एक हजारावर भाविक येणार अशी माहिती अजयजी छतवाणी ब्रँच मुखी खामगांव हयांनी दिली. निरंकारी सेवादलाच्या बंधु भगिनींनी या सत्संग सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी सत्संग मैदानावर आपली सेवा गत दोन दिवसांपासून सुरू केली आहे.
//चौकट//
संत निरंकारी मिशन ही एक आध्यात्मिक विचारधारा असून ब्रम्हज्ञानाव्दारे माणसाला माणूसकी शिकविण्यासाठी केवळ भारतच नव्हे तर संपूर्ण विश्वामध्ये निरंकारी मिशनचे मानवतेचे कार्य सुरू आहे. माणसाने माणसासारखे वागले पाहीजेत हाच संदेश पुरातन साधुसंतांनी आम्हाला दिलेला आहे. या संत तत्वज्ञानाची माहिती निरंकारी सत्संगामध्ये दिली जाते.
निरंकारी सद्गुरू माता सुदीक्षाजी यांनी नागपूर येथे झालेल्या तीन दिवसीय सत्संग सोहळ्यामध्ये ब्रम्हज्ञानाची महत्ती सांगतांना दिलेला संदेश लाखो भाविकांनी ग्रहण केला. ब्रम्हज्ञानाव्दारे खऱ्या ईश्वराची ओळख माणसाला होते. त्यामुळेच जगभर निरंकारी मिशनची एक आध्यात्मिक आणी सामाजिक मिशन म्हणून ओळख झालेली आहे. ब्रम्हज्ञानाव्दारे माणसाला माणसाशी जोडण्याचे काम निरंकारी मिशन करीत आहे. प्रेम, नम्रता, सहनशिलता ही मानवी जीवनाची अमूल्य देण आहे. त्यामुळे या सद्गुणांचा संचार ब्रम्हज्ञानाच्या माध्यमातून होतो यावर संत निरंकारी मिशनचा विश्वास आहे.
Post a Comment