जबरी चोरी, घरफोडी करणारे अट्टल चोर पोलिसांच्याा जाळ्यात, स्था. गु.शा.ची कारवाई. जबरी चोरी-02 व घरफोडी-14 गुन्ह्यांची उकल, 05 आरोपी अटक तर सोने-चांदीचा मुद्देमाल जप्त.
खामगाव :-गेल्या काही दिवसांपासून बुलढाणा जिल्ह्यामध्ये घडलेल्या जबरी चोरी तसेच घरफोडीच्या गुन्ह्यांची गंभीर दखल घेवून, पोलीस अधीक्षक श्री. सुनिल कडासने, अपर पोलीस अधीक्षक श्री. अशोक थोरात, श्री. बी. बी. महामुनी यांनी नमूद गुन्ह्याची लवकरात लवकर उकल करुन, गुन्ह्यातील आरोपीतांचा शोध घेवून, गुन्ह्यामध्ये गेलेला मुद्देमाल हस्तगत करणेबाबत श्री, अशोक लांडे, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा-बुलडाणा यांना आदेशीत केले होते. सदर गुन्हयाचे तपासाचे अनुशंगाने पोनि. श्री. अशोक लांडे स्था गु.शा, बुलढाणा यांनी अधिनस्त पोलीस अधिकारी व अंमलदार यांची वेगवेगळी स्वतंत्र समांतर तपास पथके तयार करुन, नमुद गुन्ह्याची यशस्वी उकल, गुन्ह्यातील आरोपीतांचा शोध आणि गेलेला मुद्देमाल हस्तगत करणेबाबत सुचना केल्या. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास मिळालेल्या गोपनीय माहिती वरून पो.स्टे. खामगांव शहर अप.क्र 547/2023 कलम 457, 380 भादंविचा गुन्हा खालील नमुद आरोपीतांनी केला आहे. सदर गुन्ह्याची थोडक्यात हकीकत खालील प्रमाणे. हकीकत :- फिर्यादी श्री. संजु रामराव पाटील वय 52 वर्षे, रा. आदर्शनगर, खामगांव यांनी रिपोर्ट दिला की, दि.6/10/2023 रोजी फिर्यादी यांचे राहते घराचा कुलूप व कडीकोंडे तोडून, अज्ञात आरोपीतांनी त्यांच्या घरात प्रवेश करुन, घरातील सोन्या-चांदीचे दागीने आणि नगदी रोख रुपये असा एकूण 31,000/-रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला. नमुद प्रकरणी दि. 07/10/2023 रोजी पो.स्टे. खामगांव शहर येथे गुरनं. 547/2023 कलम 457, 380 भादंवि प्रमाणे गुन्हा नोंद होता. मिळालेल्या गोपनीय माहिती नुसार, सदर गुन्ह्यात ग्राम बिरेगांव तांडा ता.जि. जालना व मंठा ता. मंठा जि. जालना येथून खालील आरोपी अद्याप पावेतो अटक करण्यात आलेले आहेत. * गुन्ह्याचे तपासामध्ये अटक करण्यात आलेले आरोपीतांची नावे :- 1) बाबासाहेब कोल्हापुरे शिंदे वय 22 वर्षे, रा. विरेगांव तांडा ता. जालना, 2) विलास साहेबराव पवार वय 25 वर्षे, रा. रामपूरी ता. गेवराई जि. बीड 3) अमोल सुरेश पवार वय 19 वर्षे, रा. मंगरुळ, ता, घणसावंगी जि. बीड, ) दिपक मारुती शिंदे वय 20 वर्षे, रा. विरेगांवतांडा, ता.जि, जालना 4 5) पांडू गंगाराम पवार रा. मंगरुळ, ता. घनसावंगी (आरोपी अटक कारवाई दि.01/01/2024) सदर आरोपीतांना पो.स्टे. खामगांव शहर, बोराखेडी, चिखली येथील गुन्ह्यामध्ये अद्याप पावेतो ट्रान्सफर कारवाई करण्यात आलेली आहे. सदर कारवाई व तपासा दरम्यान आरोपीलां कडून खालील प्रमाणे मुद्देमाल जप्त केला आहे. * तपासा दरम्यान आरोपीतांनी दिलेल्या गुन्ह्यांची कबुली :- जबरी चोरीचे 02 व घरफोडीचे 14 एकूण 16 गुन्हे उघडकीस. (1) पो.स्टे. खामगांव शहर- घरफोडीचे-04 गुन्हे. (2) पो.स्टे. बोराखेडी- घरफोडी-01 व जबरी चोरी- 01 गुन्हे, (3) पो.स्टे. चिखली- घरफोडी-03 गुन्हे, (4) पो.स्टे. डोणगांव- घरफोडी-03 गुन्हे, 5) पो.स्टे. बुलढाणा शहर- जबरी चोरी 01 गुन्हा. ( (6) पो.स्टे. मेहकर- घरफोडी 01 गुन्हा. (7) पो.स्टे. देऊळगांव राजा- घरफोडी-01 (8) पो.स्टे. अकोट जि. अकोला- घरफोडीचा प्रयत्न-01
जप्त मुद्देमाल :- 105 ग्रॅम सोने किं. 6,51,000/-रुपये, 264 ग्रॅम चांदी किं. 20,064/- रुपये तसेच गुन्ह्याशी संबंधीत हत्यारे मुद्देमाल. एकूण- 6,71,064/- रुपये मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तसेच ईतर ।। गुन्ह्यांमध्ये ट्रान्सफर कारवाई करणे बाकी आहे. तसेच ईतर गुन्ह्यात आरोपी ट्रान्सफर झाल्या नंतर संबंधीत गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. * गुन्ह्यातील फरारी आरोपीतांचा शोध :-. गुन्ह्यातील फरारी आरोपीतांचा शोध घेण्यासाठी मा. पोलीस अधीक्षक बुलढाणा यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि, श्री. अशोक एन. लांडे प्रभारी अधिकारी स्थागुशा. यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथके तयार करण्यात आले असून, सदर पथक कडून गुन्ह्यामध्ये फरारी आरोपीतांचा कसोशीने शोध घेण्यात येत आहे. * वरिष्ठ पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शन व कामगिरी पथक मा. पोलीस अधीक्षक श्री. सुनिल कडासने, अपर पोलीस अधीक्षक श्री. अशोक थोरात, श्री. बी.बी. महामुनी यांनी जिल्ह्यात होत असलेल्या जबरी चोरी आणि घरफोडीच्या घटनांना अत्यंत गांभीर्याने घेवून, सदर गुन्ह्यातील आरोपींचा शोध तसेच अशा गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याबाबत सुचना दिल्या होत्या. सदर अनुशंगाने, पोनि, श्री. अशोक एन. लांडे, स्थानिक गुन्हे शाखा- बुलढाणा यांनी अधिनस्त पोलीस स्टाफ यांची वेगवेगळी पथके तयार करुन, त्यांना गुन्हे संबंधाने गोपनीय माहिती संकलीत करणे, अशा गुन्हेगारांची माहिती काढून त्यांचे हालचालींवर लक्ष ठेवणे तसेच तांत्रीक स्वरुपामध्ये तपास करणे, जिल्हा व जिल्हया बाहेरील गुन्हेगारांचा अभिलेख पडताळणे बाबत सुचनात्मक मार्गदर्शन केले. सदर प्रकरणी एकंदर केलेल्या तपासामध्ये गुन्ह्यामध्ये बाहेरील जिल्ह्यातील आरोपीतांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. त्या प्रमाणे गोपनीय खबर आणि तांत्रीक माहितीच्या आधारे वरील प्रमाणे गुन्ह्यांची उकल करुन, आरोपीतांना बाहेरील जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे. सदर कारणाने जिल्ह्यामध्ये घडलेल्या गुन्ह्यांची यशस्वी उकल होवून, जिल्ह्यातील मालमत्ता संबंधीत गुन्ह्यांना प्रतिबंध झालेला आहे. सदरची कामगिरी श्री. सुनिल कडासने- पोलीस अधीक्षक बुलडाणा, श्री. अशोक थोरात-अपर पोलीस अधीक्षक खामगांव, श्री बी. बी महामुनी- अपर पोलीस अधीक्षक- बुलढाणा व श्री विनोद ठाकरे, उप विभागीय पोलीस अधिकारी, खामगांव यांचे आदेशाने व मार्गदर्शनाखाली, पोनि. श्री. अशोक एन. लांडे, सपोनि, विलासकुमार सानप, नंदकिशोर काळे, निलेश सोळंके, पोउपनि, श्रीकांत जिंदमवार, सचिन कानडे, पोलीस अंमलदार रामविजय राजपूत, राजकुमार राजपूत, शरद गिरी, दिपक लेकुरवाळे, जगदेव टेकाळे, दिनेश बकाले, पंकज मेहेर, एजाज खान, दिगंबर कपाटे, पोना, गजानन दराडे, गणेश पाटील, युवराज राठोड, पुरुषोत्तम आघाव, अनंता फरताळे, सतिष हाताळकर, मपोना, वनिता शिंगणे, पोकों, गजानन गोरले, अमोल शेजोळ, वैभव मगर, अजीज परसुवाले, मनोज खरडे, दिपक वायाळ शिवानंद मुंढे, विलास भोसले-स्था.गु.शा. बुलढाणा, राजू आडवे तांत्रीक विष्लेषण विभाग, सायबर पो.स्टे., बुलढाणा, पोना, संदिप शेळके, पोकॉ. अमोल तरमळे, योगेश सरोदे सी. एम.एस. विभाग, पो.अ. कार्यालय, बुलढाणा यांचे पथकाने तसेच पोलीस ठाणे खामगांव शहर येथील पोउपनि पंकज सपकाळ, पोलीस अंमलदार प्रदिप मोठे, रविंद्र कन्नर, राहूल धारकर, अंकूश गुरूदेव, सागर भगत, गणेश कोल्हे यांनी पार पाडली आहे. स्वाक्षरित/- पोलीस अधीक्षक, बुलढाणा करीता प्रति. सर्व पत्रकार बांधवांना सस्नेह अग्रेषित.
Post a Comment