पक्ष संघटन व जनसेवा पाहून राम मिश्रा यांची भाजयूमो प्रदेश सचिव पदी यांची वर्णी
खामगाव :- रुग्णसेवा असो व इतर समाजकार्यात सदैव अग्रेसर असणारे भाजयूमो खामगाव चे शहराध्यक्ष राम मिश्रा यांची कामाची दखल घेत त्यांची वर्णी थेट भाजयुमो महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी करण्यात आली आहे.
भारतीय जनता पार्टीचे कट्टर कार्यकर्ते राम मिश्रा यांनी लोकने
ते स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर यांचे आशीर्वाद व मार्गदर्शनाखाली खामगाव शहरात भारतीय जनता पार्टीची ताकद वाढवण्याचे काम केले. त्यानंतर त्यांनी खामगावचे लाडके आ. अँड. आकाश फुंडकर व भाजपा महाराष्ट्र प्रदेश सोशल मीडियाचे सहसंयोजक सागरदादा फुंडकर यांचे मार्गदर्शनाखाली खामगाव शहर व मतदार संघात युवकांची मोठी फौज भारतीय जनता पार्टीकडे युवा मोर्चाच्या माध्यमातून जमवली. त्यांची समाजसेवेची धडपड पाहून आ अँड आकाश फुंडकर यांनी जिल्ह्यातील सर्वात मोठ्या अशा खामगाव उपजिल्हा सामान्य रुग्णालयाच्या रुग्ण कल्याण समितीवर वर्णी लावली. त्या माध्यमातून त्यांनी अनेक रुग्णांना मदत केली व त्यांचे चांगले उपचार करून घेतले व ते आजही करत आहेत. तसेच खामगाव मध्ये सर्वात मोठे रक्तदान शिबिर ते दरवर्षी घेत असतात. मागील वर्षात तर आ अँड आकाश फुंडकर यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात खामगाव उपजिल्हा रुग्णालय व खाजगी असलेल्या सोनी पॅथॉलॉजी लॅब या दोन्ही रक्तपेढीमध्ये रक्त ठेवण्यासाठी पुरेशी जागा नव्हती एवढे युवकांनी त्यांचे माध्यमातून रक्तदान केले. त्यांचे पक्ष वाढीसाठी केलेले प्रयत्न व समाजकार्य पाहून त्यांना खामगाव भाजपा युवा मोर्चाच्या शहराध्यक्ष पदापासून थेट युवा मोर्चाच्या प्रदेश सचिव पदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष राहुलजी लोणीकर यांनी अधिकृत रित्या त्यांना नियुक्तीपत्र पाठविले आहे. या नव्या नियुक्तीनंतर त्यांचा सत्कार आ अँड आकाश फुंडकर व सागरदादा फुंडकर यांचे सह भाजपाचे पदाधिकारी ,विविध सामाजिक संस्था, संघटना यांनी केला.
Post a Comment