बुलढाणा जिल्ह्यातील चार पोलिसांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान


बुलडाणा:-बुलढाणा जिल्हा पोलीस घटकातील चार पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी  प्रशंसनीय सेवा केल्याबद्दल मोहन धोंदूजी करुटले, सहा. पोलीस उपनिरीक्षक, खामगांव शहर,श्रीकांत रामराव जिंदमवार, पोलीस उपनिरीक्षक, स्था.गु.शा.,शिवाजी मधुकर अरबट ब.नं.26 पोलीस हवालदार, नांदुरा, राजु विनायकराव मुंढे ब.नं. 1516, पोलीस हवालदार, शेगांव ग्रा. यांना पोलीस महासंचालक यांचे प्रशस्तीपत्रक (प्रमाणपत्र) देऊन सन्मानित करण्यात आले. आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांच्या हस्ते पोलीस अधिक्षक कार्यालय, बुलडाणा येथे सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.


Post a Comment

Previous Post Next Post