शेख सलीम शेख फरीद यांची रा. काँ. अल्पसंख्यांक आघाडी बुलडाणा जिल्हाकार्याध्यक्षपदी नियुक्ती

खामगांव (का. प्र.) :-  राष्ट्रवादी काँग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते आणि राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांचे कट्टर समर्थक  तथा सा. आधारवडचे संपादक शेख सलीम शेख फरीद यांची  रा. काँ. (शरद  पवार गट) अल्पसंख्यांक  आघाडीच्या बुलडाणा जिल्हा कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 


नियुक्तीचे पत्र  रा. काँ. (शरद  पवार गट) अल्पसंख्यांक  आघाडी चे प्रदेशाध्यक्ष जावेब हबीब  यांच्या  हस्ते नुकतेच देण्यात आले आहे. आद. श्री. शरद पवार साहेब यांच्या विचारानुसार पुढील काळात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाच्या माध्यमातून सर्वसामान्य अल्पसंख्यकांच्या विकासात  आपण भरीव कार्य कराल व  पक्ष संघटना मजबुत कराल ही अपेक्षा असे  नियुक्तीपत्रात नमुद करण्यात आले आहे. 

शे. सलीम हे गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात विविध पदांवर कार्य करीत असून  पक्षाचे माध्यमातून विविध कार्यक्रम राबवित  पक्ष मजबूत करण्याकरीता सहकार्य करीत आहेत. २०% राजकारण आणि ८० % समाजकारण या  ना. शरदचंद्र पवार यांनी दिलेल्या निर्देशानुसार  कार्यरत असून त्यांच्या पक्षनिष्ठेचे फळ त्यांना मिळाले आहे. प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील यांच्या मान्यतेनुसार ही नियुक्ती करण्यात आली असून  सदर नियुक्तीपत्र अकोट येथे  नुकत्याच झालेल्या मुशायरा कार्यक्रमात देण्यात आले यावेळी रा. काँ. (शरद  पवार गट) अल्पसंख्यांक  आघाडी बुलडाणा जिल्हा अध्यक्ष एम. डी. साबीर, रा. काँ.  प्रदेश संघटक सचिव रवी राठी, समाजसेवक शौकतअली शौकत, असलम ठेकेदार (खामगांव), कैलासदादा, जावेद सिद्दीकी, अकोला महानगर अध्यक्ष रफिक सिद्दीकी, अकोला महानगर कार्याध्यक्ष  युसुफअली, महेमुदखान, वसीमखान,  आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post