राज्यस्तरीय आदर्श संपादक पुरस्कार प्राप्त नितेश मानकर व सय्यद अकबर यांचा आदर्श ज्ञानपीठ च्या वतीने सत्कार
स्थानिक घाटपुरी नाका परिसरातील आदर्श ज्ञानपीठ इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेजयेथे पत्रकार नितेश मानकर व सय्यद अकबर सय्यद यांना राज्यस्तरीय आदर्श संपादक पुरस्कार मिळाल्या बद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. आय एस ओ द्वारा प्रमाणित हिंदी मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिनी राज्यस्तरीय आदर्श संपादक पुरस्काराने सन्मानित जनोपचार न्यूज चॅनल चे संपादक नितेश मानकर आणि सांज दैनिक एकच घाव चे संपादक सय्यद अकबर सय्यद यांचा संस्थेचे अध्यक्ष के आर राजपूत यांच्या द्वारे शाल, श्रीफळ व बुके देऊन सत्कार करण्यात आला.
पत्रकार हेच समाजाचा आरसा आहेत व त्यांच्यामुळेच आपणाला समाजातील घडणाऱ्या सर्व बाबींची माहिती मिळते. असे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष के आर राजपूत यांनी याप्रसंगी केले. सत्कार समारंभाला संस्थेचे सदस्य कविश्वर राजपूत, आदर्श ज्ञानपीठ इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज चा स्टाफ, पालकवर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post a Comment