श्री सरस्वती इंग्लिश स्कूल अंत्रज ला मेष्ठा2024 चा बेस्ट स्कूल अवार्ड
खामगाव :- दिनांक 18 व 19 जानेवारी 2024 रोजी मुंबई येथे महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टी असोसिएशन चे राज्यस्तरीय अधिवेशन आयोजित करण्यात आले होते सदर कार्यक्रमाचे उद्घाटन शालेय शिक्षण मंत्री मा.दिपक केसरकर साहेब यांच्या हस्ते झाले तर प्रमुख उपस्थिती मेष्ठाचे अध्यक्ष डॉ संजयराव तायडे, ब्रँड अम्बेसिटर अभिनेत्री निशिगंधा वाड व इतर मान्यवर उपस्थित
होते सदर कार्यक्रमाधे श्री सरस्वती इंग्लिश स्कूल अंत्रज ला शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत सर्व सुविधेसह दर्जेदार शिक्षण संस्थेच्या माध्यमातून मिळत असुन संस्थेमध्ये आधूनिक ई - लर्निगसह MS-CIT, Tally व सर्व प्रकारचे कम्प्युटर कोर्स एमकेसीएलच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आले आहे त्यामुळे सर्वसामान्य विध्यार्थ्यांना याचा लाभ होत आहे. या शैक्षणिक कार्यामुळेच संस्थेला या अधिवेशनामध्ये MESTA 2024 बेस्ट स्कूल अवॉर्ड ने सम्मानित करण्यात आले संस्थेच्या वतीने सदर पुरस्कार संस्थेचे अध्यक्ष मा.श्रीकांत चोपडे सर यांनी स्वीकारून सर्व शिक्षक वर्ग यांच्या असलेल्या अथक परिश्रमामुळे आज परिसरातील विध्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळत आहे म्हणून हा पुरस्कार संस्थेच्या वतीने विद्यार्थी व शिक्षक वर्ग यांना बहाल करण्यात आला त्यामुळे परिसरामध्ये आनंदाचे वातावरण आहे.
Post a Comment