आखिल भारतीय अधिवक्ता परीषद विदर्भ प्रांत यांच्या वतीने संतनगरी शेगाव येथे एक दिवसीय अधिवेशनाचे आयोजन....


शेगाव : दिनांक 09/12/2023 रोजी आखिल भारतीय अधिवक्ता परिषद  यांच्या वतीने एक दिवसीय अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे.

सदर कार्यक्रमाचे आयोजन हे आखिल अधिवक्ता परिषद विदर्भ प्रांत यांनी संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय खामगाव रोड संतनगरी शेगाव येथे आयोजित केले आहे.

सदर कार्यक्रम हा तीन सत्रामध्ये होणार असून पहिले सत्र सकाळी 11 ते 12.20 पर्यंत चालणार आहे सदर कार्यक्रमाचे उद्घाटन सर्वोच्च न्यायालय दिल्ली येथील माननीय न्यायमूर्ती बी.आर.गवई साहेब यांचे हस्ते होणार आहे. पहिल्या सत्रामध्ये मंचावर सर्वोच्च न्यायालय दिल्ली येथील माननीय न्यायमूर्ती बी.आर.गवई साहेब, उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर येथील माननीय न्यायमूर्ती नितीन सांबरे साहेब , उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर येथील माननीय न्यायमूर्ती अनिल किलोर साहेब तसेच उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर येथील माननीय न्यायमूर्ती उर्मिला जोशी फलके मॅडम उपस्थित राहणार आहे.

तसेच सोबतच मंचावर अडिशनल सॉलिसिटर जनरल ऑफ इंडियाचे माननीय अनिल सिंग साहेब,आखिल भारतीय अधिवक्ता परिषदेचे राष्ट्रीय महामंत्री माननीय डी.भरत कुमार साहेब उपस्थित असणार आहे तसेच बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवा चे अध्यक्ष माननीय ॲड पारिजातजी पांडे साहेब मंचावर उपस्थित राहणार आहे.व इतर मान्यवर मंचावर उपस्थित राहणार आहे.

तसेच दुसरे सत्र हे दुपारी 12.45 ते 2.15 वाजता होणार असून दुसऱ्या सत्रामध्ये उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर येथील माननीय न्यायमूर्ती उर्मिला जोशी फलके मॅडम प्रमुख अतिथी म्हणून लाभणार आहे

तसेच बार कौन्सिल ऑफ इंडिया चे सदस्य माननीय ॲड. जयंत जायभावे हे .New Horizons in trial court practice.या विषयावर अधिवक्ता सदस्यांना मार्गदर्शन करणार आहे. व बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवा चे सदस्य माननीय ॲड.संग्राम देसाई हे Analysis of chargesheet,An Art.या विषयावर अधिवक्ता सदस्यांना मार्गदर्शन करणार आहे...या वेळी ईतर मान्यवर मंचावर उपस्थित असणार आहे.

शेवटचे सत्र दुपारी 3.30 ते 4.30 वाजता  होणार असून या सत्रास प्रमुख अतिथी विधी व न्याय मंत्री तथा उपमुख्यमंत्री माननीय ॲड.देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती असणार आहे तर मंचावर आखिल भारतीय अधिवक्ता परिषदेचे राष्ट्रीय महामंत्री  माननीय डी.भरत कुमार साहेब उपस्थित राहणार आहे.सदर कार्यक्रमास विदर्भ प्रांतातील 2000 पेक्षा अधिक अधिवक्ता सदस्यांनी फॉर्म भरून नोंदणी केलेली आहे  आखिल भारतीय अधिवक्ता परिषद विदर्भ प्रांतचे अध्यक्ष माननीय दत्तात्रय दुबे साहेब व महामंत्री भूषण काळे साहेब यांच्या वतीने कळवीण्यात आले आहे...



Post a Comment

Previous Post Next Post