कर्तव्यदक्ष ठाणेदार शांतीकुमार पाटील यांची विनंतीवरून बदली ;  दबंग नरेंद्र ठाकरे  नवे ठाणेदार 

खामगाव- शहर पोलीस स्टेशनचे दाणेदार शांतीकुमार पाटील यांची विनंती वरून जिल्हा बिशेष शाखा बुलढाणा येथे बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी नसेंद्र ठाकरे यांची ठाणेदार म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.



काही महिन्यापूर्वीच खामगाव शहर पोस्टेला आलेले ठाणेदार शांतीकुमार पाटील याची विनंती वरून जिल्हा विशेष शाखा बुलढाणा येथे बदली करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधिक्षक सुनील कड़ासने यांनी एका आदेशाद्वारे ही बदली केली असून त्यांच्या जागी खामगाव शहर पोलीस स्टेशनला ठाणेदार म्हणून जिल्हा बिशेष शाखा येथील नरेंद्र ठाकरे यांनी नेमणूक करण्यात आली आहे. ठाकरे हे आज दुपारी शहर पोस्टेच्या ठाणेदारपदी रूजू झाले, त्यांनी शांतीकुमार पाटील यांच्याकडून चार्ज घेतला.

Post a Comment

Previous Post Next Post