संत निरंकारी चॅरिटेबल फौंडेशन तर्फे भव्य निःशुल्क आरोग्य तपासणी शिबिर

शेगांव(प्रतिनिधी):*  संत निरंकारी चॅरिटेबल फौंडेशन द्वारे भव्य निःशुल्क आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन दिनांक ९/१२/२०२३ शनिवारी सकाळी ११ ते १ या वेळेमध्ये  १८ ते ५० या वयोगटातील सर्व युवक व युवती  यांच्याकरिता निरंकारी सत्संग भवन खामगाव रोड शेगांव येथे होणार आहे असलयाची माहिती  संत निरंकारी मंडळाचे  शेगांव ब्रँच चे मुखी व बुलडाणा जिल्हा संयोजक संतोष शेगोकार  यांनी दिली व जास्तीत जास्त तरुणांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आव्हान केले आहे.


             या शिबिरामध्ये हिमोग्लोबिन, शुगर, ब्लडप्रेशर, ऑक्सिजन मात्रा, वजन इत्यादी ची निःशुल्क तपासणी होणार आहे. सदर शिबिरात आरोग्य तपासणी करीता सईबाई मोटे सामान्य  रुग्णालयामधील वैद्यकीय टीम सोबत डॉ.अंकिता काटकर, डॉ.महेश वानरे, डॉ. अनुराग सुरळकर, डॉ.शीतल काळमेघ, डॉ. आनंद काळमेघ यांची मुख्य उपस्थिती लाभणार आहे.

           संपूर्ण विश्वामध्ये  संत निरंकारी मिशनच्या मानवतेच्या कार्यामध्ये वेळोवेळी  रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, नदी-नाले, तलाव, सरोवर, रेल्वेस्टेशन, रुग्णालय इत्यादीची साफसफाई, नैसर्गिक आपत्ती मध्ये सहाय्यता केली जाते असे अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात. त्याचाच एक भाग म्हणून भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन या शनिवारी करण्यात आले आहे.


Post a Comment

Previous Post Next Post