मलकापूर येथील सामाजिक कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश 


खामगाव प्रतिनिधी: वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार ॲड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या विचारांशी प्रेरित होऊन मलकापूर येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी १९ डिसेंबर रोजी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश घेतला आहे. मलकापूर येथील सामाजिक कार्यकर्ते अजय प्रभाकर सावळे व दसरखेड ग्रामपंचायत सदस्य प्रल्हाद प्रताप बिऱ्हाडे, यांनी त्यांच्या कार्यकर्त्या सोबत पश्चिम विदर्भ उपाध्यक्ष शरदभाऊ वसतकार, जिल्हाध्यक्ष गणेशभाऊ चौकसे,बाजार समितीचे उपसभापती संघपाल जाधव यांच्या उपस्थितीत प्रवेश घेतला. यावेळी जिल्हा महासचिव आतिशभाई खराटे, मलकापूर तालुकाध्यक्ष सुशील मोरे, रमेश गवारगुरु, दीपक महाजन, शुभम मोरे, विशाल तायडे, सनी सावळे, विजय बिऱ्हाडे, अमित फुलारे, प्रमोद जावळेकर,अनिल शेगोकार उपस्थित होते. यावेळी वंचितांची चळवळ मलकापूर मध्ये जोमाने वाढवू आणि एडवोकेट बाळासाहेब आंबेडकर यांचे हात मजबूत करू असा विश्वास अजय सावळे यांनी व्यक्त केला. -

Post a Comment

Previous Post Next Post