शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत करा -जयश्री पंडागळे यांची  मागणी     


 
चांदुर बाजार:-(जनोपचार न्यूज नेटवर्क)  मागील तीन दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे      शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे त्यामुळे त्यांना हेक्टरी 50 हजाराची मदत करावी अशी मागणी जयश्री पंडागळे  यांनी केली पावसामुळे  संत्रा कपाशी गहू हरभरा तूर कांदा या पिकाचे नुकसान झाले या अचानक आलेल्या संकटामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे      कपाशी व सोयाबीन पिकाला भाव नसल्यामुळे शेतकरी पूर्वीपासूनच आर्थिक संकटात सापडलेला आहे या संकटाच्या काळी शासनाने शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे गरजेचे असून झालेले नुकसानाचे पंचनामे करून हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपयाची मदत करून  दिलासा द्यावा अशी मागणी जयश्री पंडागळे यांनी केली आहे

Post a Comment

Previous Post Next Post