गुरुवारी खामगावात भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबीर : होमिओपॅथी द्वारे होणार तपासणी

खामगाव प्रतिनिधी:-गुरुवार दिनांक 7 डिसेंबर रोजी न.प. शाळा क्र. १२, नाना-नानी पार्कच्या बाजुला, जलंब रोड, खामगांव येथे  होमिओपॅथी द्वारे मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. शिबिराचे उद्घाटन सागर दादा फुंडकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.


 या शिबिरात मायग्रेन,मुळव्याध ,अॅसिडीटी ,मुतखडा PCOD इ. आजारांवर होमिओपॅथीव्दारे तपासणी व प्रभावी उपचार केले जाणार आहे. शिबिरातील रुग्णांची तपासणी डॉ.सौ. अनुराधा वि. गांधी ह्या करणार आहेत. शिबिरात येण्याअगोदर नाव नोंदणी आवश्यक असून नांव नोंदणीसाठी सुंदरम फर्निचर, बालाजी प्लॉट, खामगांव, मो.८३८१०१०८३५ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन आयोजक सौ. भाग्यश्री विक्रम मानकर माजी नगरसेविका यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post