जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलर अँड गुंजकर कॉलेज आवार येथे श्रीनिवास रामानुजन यांची जयंती साजरी
खामगाव: दिनांक 22 डिसेंबर 2023, रोजी जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलर्स अँड गुंजकर ज्युनिअर कॉलेज आवार येथे श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त गणित दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. रामकृष्ण गुंजकर सर व शाळेचे मुख्याध्यापक श्री. डी. एस जाधव सर यांच्या हस्ते श्री रामानुजन यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक देशमुख मॅडम यांनी केले.
यावेळी संस्था अध्यक्ष यांनी श्रीनिवास रामानुजन यांच्या जीवनावर प्रकाश टाकला तसेच शाळेचे मुख्याध्यापक यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. राष्ट्रीय गणित दिवस साजरा करण्यासाठी शाळेतील वर्ग सहावी ते दहावी च्या विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे गणित या विषयाशी संबंधित प्रोजेक्ट, मॉडेल, चार्ट व इतर गणित विषयातील संकल्पना यातून उत्कृष्ट पद्धतीने गणित प्रदर्शनी मध्ये सादरीकरण केले.
यावेळेस माननीय श्री गुंजकर सर ,माननीय श्री जाधव सर, ब्राह्मणे सर, जाट सर, देशमुख मॅडम यांनी प्रदर्शनीचे निरीक्षण करून त्यामधील उत्कृष्ट गणित विषयातील आपल्या प्रोजेक्टच्या स्वरूपातील मांडणी केलेल्या विद्यार्थ्यांमधून काही विद्यार्थ्यांचे प्रोत्साहन पर बक्षिसासाठी निवड केली. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाला उपस्थित शाळेचे उपमुख्याध्यापक श्री अल्लाट सर, श्री मोरे सर, श्री घोडके सर,श्री हट्टेल सर, श्री बंड सर, डाबरे मॅडम, ठाकरे मॅडम, मोरे मॅडम, लोखंडे मॅडम, शेलकर मॅडम सांजोरे मॅडम, जामोदे मॅडम, भोपळे मॅडम,अवताडे मॅडम, देवचे मॅडम, वाघमारे मॅडम, तायडे भाऊ,इंगळे काका, तायडे ताई, आदी शिक्षक शिक्षोत्तर कर्मचारी तसेच शिवा भाऊ, बोचरे मावशी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन दहावी वर्गातील सर्व विद्यार्थ्यांनी जाट सर आणि देशमुख मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडले. या कार्यक्रमात सूत्रसंचालन दिपाली देशमुख व कोमल काटने यांनी केले व आभार प्रदर्शन विवेक लांजुडकर या विद्यार्थ्यांनी केले.
Post a Comment