शहरी गरीब लाभार्थी म्हणून नोंद करून दिनदयाळ अंत्योदय योजना - राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान DAY-NULM योजनेचा लाभ घ्यावा- मुख्याधिकारी डॉ. प्रशांत शेळके  

खामगाव (प्रतिनिधी) -दिनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान DAY-NULM माध्यमातून शहरी भागातील शहरी गरीब कुटुंबांना त्यांचा आर्थिक व सामाजिक दर्जा उंचावणे बचत गटांद्वारे संघटन करणे स्वयंरोजगारासाठी पतपुरवठा उपलब्ध करणे कौशल्य वृद्धी करणे बेघरांना निवाऱ्याची सोय करणे पथ विक्रेत्यांना योग्य पद्धतीने प्रशिक्षण देणे व पतपुरवठा करणे अशा प्रकारे विविध लाभ दिले जातात. राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानातील विविध घटकांतर्गत शहरी गरीब लाभार्थ्यांचे (महिलांना प्राधान्य) स्वयंसहाय्यता बचतगट स्थापन करणे गटांच्या संस्था उभ्या करणे विविध प्रशिक्षणाच्या माध्यमातून गटांमधील सदस्यांचे सक्षमीकरण करणे गटांना तसेच वैयक्तिक सदस्यांना उद्योग व्यवसायासाठी बैंक कर्ज उपलब्ध करून देणे व्यवसायासाठी आवश्यक सहाय्य करणे असे विविध उपक्रम राबविले जात आाहेत. या अभियानाचा जास्तीत जास्त शहरी गरीब व्यक्तींना लाभ व्हावा जेणेकरून राज्यामध्ये शहरी गरिबी कमी करण्याचे मोठ्या प्रमाणात काम करता येईल यासाठी अभियानांतर्गत लाभार्थी निश्चितीबाबत वरील संदर्भानुसार सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. दि. २ ऑगस्ट २०१६ च्या शासन निर्णयानुसार सामाजिक आर्थिक जावनिहाय जनगणना यादीतील ते ७ क्रमांकातील उत्पन्न स्रोतांच्या आधारे कुटुंबाच्या किंवा व्यक्तींच्या यादीमध्ये काही कारणास्तव नाव न आलेल्या कुटुंबातील सदस्यांना शहरी गरीब लाभार्थी समजण्यात येऊन त्यांना अभियानातील विविध घटकांतर्गत लाभ देण्यात येत आहेत.

पीएम स्वानिधी योजना,दीनदयाळ अंत्योदय योजना -राष्ट्रीय नागरिक उपजीविका अभियानांतर्गत आतापर्यंत पहिल्या टप्प्यात 187 फेरीवाल्यांना प्रत्येकी दहा हजार दुसऱ्या टप्प्यात 157 फेरीवाल्यांना वीस हजार रुपये प्रमाणे तर तिसऱ्या टप्प्यात 50 फेरीवाल्यांना 50 हजार रुपयाप्रमाणे कर्ज वाटप करण्यात आले

राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानांतर्गत नवीन बचत गटांची निर्मिती करून राज्यातील जास्तीत जास्त शहरी गरीब व्यक्तींना अभियानातील उपक्रमांचा लाभ उपलब्ध करून देण्यासाठी सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्था यांना अभियान लाभार्थी निवड पद्धतीमध्ये सुधारणा बाबत नवीन सूचना शासनाकडून निर्गमित करण्यात आल्या आहेत.

भिकारी, चिंधी बेचणारे घर कामगार रस्त्यावरील विक्रेता, चर्मकार, फेरीवाला रस्त्यावर काम करून अन्य सेवा पुरविणारे, बांधकाम कामगार, नळ कारागीर, गवंडी मजूर, रंगारी सुरक्षा रक्षक हमाल, अन्य माथाडी कामगार सफाई कामगार, स्वच्छता कामगार माळी, गृह उद्योग कामगार, कलाकार, हस्त व्यवसाय कामगार, शिंपी, वाहतूक कामगार, चालक, वाहक, चालकाचा वाहकाचा मदतनीस, गाडीवान, रिक्षा चालक- हे उत्पन्न स्रोत असलेल्या कुटुंबाचा किंवा व्यक्तीचा SECC- २०११ यादीमध्ये काही कारणास्तव समावेश नसला तरी त्या कुटुंबातील सदस्यास DAY-NULM अभियानातील विविध घटकांच्या आवश्यक पात्रतेनुसार शहरी गरीब लाभार्थी म्हणून लाभ देता येईल. SECC २०११ नुसार ते ७ क्रमांकाचे उत्पन्न स्रोत आहे, परंतु यादीत नाव नाही अशा लाभार्थी सदस्यांची स्वतंत्र यादी तयार करून,शहरातील जास्तीत जास्त शहरी गरीब सदस्यांना राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानातील विविध घटकांतर्गत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचा लाभ देण्यात येईल तरी खामगाव शहरातील वरिल प्रवर्गात असलेले शहरी गरीब लाभार्थी यांना नगर परिषद खामगाव तर्फे जाहिर आवाहन करण्यात येते की त्यांनी आपल्या नावाची नोंदणी प्रत्यक्षात अर्ज भरून दिनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान DAY-NULM विभागात करावी.असे आवाहन मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत शेळके यांनी केले आहे

Post a Comment

Previous Post Next Post