महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे नवनियुक्त सरचिटणीस
गौतम गवई यांचेवर चाहत्या कडून अभिनंदनाचा वर्षाव...!
आंबेडकरी चळवळीच्या मुशीतून तयार झालेलं एक उमदं नेतृत्व अशी गौतम गवई यांची ओळख आहे. दिल्ली येथील काँग्रेसच्या मुख्य कार्यालयातून अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अनुसूचित जाती विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेश लिलोठिया यांच्या स्वाक्षरीने नुकत्याच काही नियुक्त्यांना मान्यता मिळाली. सदर नियुक्त्यामध्ये खामगाव मतदार संघातील गौतम गवई यांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागात सरचिटणीस पदी बढती देण्यात आली आहे.
गौतम गवई यांना मिळालेल्या या नव्या नियुक्तीचा काँग्रेस पक्ष तसेच आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांना आनंद झाला असून या बहुमानाबद्धल अभिनंदन करण्यासाठी व त्यांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्ते सरसावले आहेत. गौतम गवई यांचे अभिनंदन व स्वागत करण्यासाठी आंबेडकरी समूहातील कार्यकर्ते, नेते त्यांना सतत भेटत आहेत, फोन करून तसेच सोशल मीडियातूनही शुभेच्छा देत आहेत..काँग्रेस पक्षाने केलेले कार्य व सत्तेच्या काळात अनुसूचित जाती व नव बौद्धाच्या साठी राबविलेल्या योजना यामुळे या उपेक्षित समूहात बराच काया पालट झालेला आहे. ग्रामीण भागात सुरु असलेली रमाई नावाची घरकुल योजना, नव बौद्धासाठी राबविण्यात येत असलेली दादासाहेब गायकवाड स्वाभिमान सबलीकरण योजना तसेच बौद्धाच्या मुला मुलीकरिता 100 निवासी समाजकल्याण विभागाच्या शाळा इत्यादी महत्वाच्या योजना ही काँग्रेस पक्षाची देण आहे.
या योजनामुळे गाव खेड्यांची कूस बदलली आहे. झोपडीत राहणाऱ्या प्रत्येक नवबौद्ध व्यक्तीला रमाई योजने अंतर्गत पक्के घरकुल मिळाले आहे. भूमीहीनाना जमीन मिळाली आहे. इतकंच काय तर काँग्रेसच्या कार्यकाळात 372 दलित उद्योजक तयार झालेले आहेत. हे सर्वश्रुत आहे.हा बदल बौद्ध -आंबेडकरी जनतेला भावलेला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरम नावाच्या संघटनेचे कामही ग्रामीण भागात गवई यांच्या माध्यमातून सुरु आहे. अनेक सामाजिक उपक्रम या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी केलेले आहे. लोकांशी संपर्कात राहण्यासाठी सोशल फोरम ही संघटना महत्वाची भूमिका बजावत आहे.त्यामुळेच नव तरुण नेतृत्व गौतम गवई यांच्या संपर्कात आलेले तरुण मुलं - चळवळीतील कार्यकर्ते गवई यांच्या सोबत सातत्याने विविध कार्यक्रमात राबतांना दिसत आहेत. खामगाव मधील विविध पक्षांचे पदाधिकारी - नेते, कार्यकर्ते गौतम गवई यांच्या काँग्रेस मधील नव नियुक्तीचे मोठ्या उत्साहाने अभिनंदन व स्वागत करत आहेत. समाज व मित्र म्हणून आम्हाला आनंद आहे, अशा प्रतिक्रिया भेटावयास आलेला प्रत्येक जन देत आहे. त्यामुळे एकप्रकारे गौतम गवई यांच्या नियुक्तीमुळे काँग्रेसला बळकटी येतांना दिसत आहे.
गौतम गवई यांच्या कडे यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचा प्रभार आहे. यापूर्वी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या समर्थनार्थ " संविधान रक्षक " सदस्य नोंदणी मोठ्या प्रमाणात केली होती. याचीही नोंद अनुसूचित जाती विभागाने घेतली आहे. भारत जोडो यात्रेच्या प्रचार व प्रसारासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता. पक्षाच्या मुबंई व दिल्ली येथील बैठकीला व विविध आंदोलनास गवई यांची उपस्थिती असते. नुकतेच शिर्डी येथे थाटामाटात संपन्न झालेले " संविधान के राह पर " शिबिरात गौतम गवई यांनी मोलाचे योगदान दिले. त्याची फलश्रुती म्हणून गौतम गवई यांना सरचिटणीस पदी बढती देण्यात आली. काँग्रेसचे जेष्ठ नेते तथा अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती विभागाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री डॉ नितीन राऊत यांचे ते निकटस्थ असून काँग्रेसमध्ये आता चांगलेच स्थिरावले आहेत. आंबेडकरी विचारावर पक्की श्रद्धा असलेल्या गौतम गवई यांचे नव तरुणांना आकर्षण असून त्यामुळे त्यांचा चाहता वर्ग हा दिवसेंदिवस वाढत आहे.
Post a Comment