"स्वच्छता मॉनिटर उपक्रमात युगधर्म पब्लिक स्कूल ठरली महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट द्वितीय क्रमांकाची शाळा. 

"युगधर्म पब्लिक स्कूलला मुंबई येथे स्वच्छता मॉनिटर सर्वोत्कृष्ट शाळा' म्हणून पुरस्कार."


मुंबई:-यशवंतराव चव्हाण सभागृह, मुंबई येथे स्वच्छता मॉनिटर उपक्रमात सहभागी शाळांचा माननीय शिक्षणमंत्री दिपक केसरकर सर यांच्या हस्ते सत्कार व पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षणमंत्री श्री दिपक केसरकर सर, महाराष्ट्र राज्य शिक्षण मुख्य सचिव रणजितसिंग देओल, सिने अभिनेता श्री प्रेम चोप्रा, राज्य समन्वयक श्री रोहित आर्या, बुलढाणा जिल्हा समन्वयक श्री मंगेश भोरसे उपस्थित होते. सोबतच "महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट शाळा" हा पुरस्कार घेण्यासाठी युगधर्म पब्लिक स्कूलचे अध्यक्ष श्री गोपालजी अग्रवाल, शाळेचे मुख्याध्यापक श्री संदीप सपकाळ आणि विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून हर्षित सुनिल वानखडे व प्रणव जितेंद्र जैन हे विद्यार्थी उपस्थित होते.

Advt.


विशेष म्हणजे मागील वर्षी सुद्धा युगधर्म पब्लिक स्कूलने महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट ५ शाळेमध्ये येण्याचा बहुमान पटकावला होता आणि हिच परपरा कायम राखत यावर्षी सुध्दा शाळेने महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट द्वितीय क्रमांकाची शाळा हा बहुमान प्राप्त केला. यावर्षी १ ऑगस्ट पासून या स्वच्छता मॉनिटर' या उपक्रमाला सुरुवात झाली होती, या उपक्रमामध्ये महाराष्ट्रातील जवळपास ६४००० शाळांनी सहभाग घेतला होता आणि कौतुकास्पद बाब म्हणजे या सर्व शाळांमधुन युगधर्म पब्लिक स्कूलने महाराष्ट्रातून द्वितीय क्रमांक पटकावू

Advt.

आपल्या शाळेचे तसेच आपल्या जिल्हाचे नाव उंचावले. स्वच्छता मॉनिटर उपक्रमात विद्यार्थ्यांना खूप काही शिकायला मिळाले, स्वच्छतेची आवड निर्माण झाली. इतकेच नव्हे तर जर कोणी कचरा करताना दिसल्यास त्याला सुद्धा विद्यार्थ्याकडून थांबवले गेले. त्यामुळे श्री रोहित आर्या सरांची ही संकल्पना खरंच खूप उत्तम आणि यशस्वी ठरली आहे. सोबतच बुलढाणा जिल्हा समन्वयक श्री मंगेश भोरसे सरांचे मार्गदर्शन मोलाचे लाभले आणि यामुळेच स्वच्छता मॉनिटर उपक्रमात बुलढाणा जिल्हा हा महाराष्ट्रात सर्वोत्कृष्ट ठरला.

Advt.

या उपक्रमामध्ये युगधर्म पब्लिक स्कूलचे अध्यक्ष श्री गोपालजी अग्रवाल, शाळेचे सचिव श्री मधुरजी अग्रवाल, तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री संदीप सपकाळ यांनी वेळोवेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, तसेच शाळा समन्वयक म्हणून सचिन राठोड यांनी कार्य केले. सोबतच पद्मभूषण बेलोकार, संगीता देशमुख, भाग्यश्री धोरन यांनी व्हिडिओ अपलोडिंग चे कार्य पार पाडले, सोबतच सर्व पालक, शाळेचे शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी यांनी या उपक्रमासाठी परिश्रम घेतले आणि कौतुकाचे मानकरी ठरले.

Advt.

Post a Comment

Previous Post Next Post