ज्येष्ठ पत्रकार मोहम्मद फारुक यांना "माजी राष्ट्रपती डॉ. जाकीर हुसैन राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार"प्रदान
खामगांव :- जळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत भवन येथे आदिलशाह फारुकी संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या "माजी राष्ट्रपती डॉ जाकीर हुसैन राज्यस्तरीय पुरस्कार वितरण कार्यक्रमात खामगाव येथील ज्येष्ठ पत्रकार मोहम्मद फारुक यांना डॉ जाकीर हुसैन राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले, मोहम्मद फारुक यांनी पत्रकारिता क्षेत्रात केलेल्या कार्याची दखल घेत त्यांना सन्मानित करण्यात आले
![]() |
मोहम्मद फारुक यांना पुरस्कार मिळाल्याने त्यांच्या मित्रपरिवारातर्फे शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे |
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चोपडा जि. जळगाव येथील माजी आमदार श्री कैलास गोरख पाटील हे होते. सावदा येथील डायमंड इंग्लिश मिडीयम चे अध्यक्ष डॉ हाजी हारून शेख यांच्या हस्ते फीत कापून कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले कार्यक्रमात उपविभागीय अधिकारी मनोज देशमुख ,माजी सरपंच श्री नेमिचंद उखा सोनार ,माजी आमदार कैलास पाटील चोपडा जळगाव जिल्हा अप्परकोषागार शकील देशपांडे,नायब तहसिलदार देवेंद्र चंदनकर,डॉ. राहुल मयूर जळगांव,उमवी चे सिनेट सदस्य विष्णू भंगाळे जळगाव, मजीद जकरिया जळगाव, फारूक शेख जळगाव, बबन खा लाल खा तडवी लोकनियुक्त सरपंच अडावद,श्रीमती शबनम समीर दफेदार पुणे,विकास झेंडे पुणे ,नाना डोंगरे अहमदनगर,डॉ शरीफ बागवान, अजमल शाह,अनिता चौधरी यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे संचालन फारूक पटेल सर व शबनम दफेदार यांनी केले तसेच कार्यक्रमाचे प्रस्ताविक संस्था अध्यक्ष फारूक शाह नौमानी यांनी मांडले,तर डॉ जावेद शेख यांनी आभार व्यक्त केले
याप्रसंगी मोहम्मद फारुक यांनी सुद्धा आदिलशाह फारुकी बहुउद्देशीय संस्था अडावद चे अध्यक्ष फारुक नौमानी यांचा आभार व्यक्त करण्या साठी शाल , बुके , फ्रेम देवून सत्कार केले
Post a Comment