महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग प्रदेश सरचिटणीस पदी गौतम गवई यांची नियुक्ती

खामगाव -संघर्षातून नेतृत्व कर्तृत्वाचा ठसा राज्यभर निर्माण करून छत्रपती शाहू फुले आंबेडकर विचाराचे प्रसारक व अल्पवधीच काँग्रेस पक्षामध्ये  आपले मजबूत स्थान निर्माण करणारे गौतम भाऊ गवई यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनु जाती विभागाच्या सरचिटणीस पदी निवड करण्यात आली आहे


सदरची निवड ही अखिल भारतीय काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष  राजेश लिलोटिया यांनी पत्राद्वारे केली आहे. भारत जोडो यात्रे दरम्यान गवई यांनी केलेले कार्य आणि आंबेडकरी जनतेप्रती आणि त्यांच्या न्याय हक्काप्रती असलेली त्यांची समर्पित भावना यामुळे मागासवर्गीय घटकापर्यंत काँग्रेस पक्ष पोहोचवण्याचं काम त्यांनी केलं आहे.
Advt.

काँग्रेस पक्षांमध्ये संघटनात्मक बदल करण्यात आले असून गौतम गवई यांचे काम बघता त्यांना सरचिटणीस पदी बढती देण्यात आली आहे. त्यांच्या नवं नियुक्ती मुळे खामगाव मतदार संघात काँग्रेस आणखी मजबूत होईल असा विश्वास त्यांच्या चाहत्यांनी व्यक्त केला. निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या नियुक्ती मुळे गौतम गवई यांचे चाहते आनंदित झाले आहेत.गौतम गवई यांच्या संघर्ष यात्रेत काँग्रेस जणांचे नेतृत्व उजळ होणार असल्याची खात्री असल्याने त्यांची निवड करण्यात आली आहे या निवडीमुळे त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे

Post a Comment

Previous Post Next Post