धन धन गुरू नानक देवजी यांच्या 554 व्या जयंतीनिमित्त खामगावात भव्य नगर कीर्तन
मिरवणुकीत बुलढाणा, अकोला, अमरावती, नांदेड येथून भाविक होणार सहभागी
खामगाव:-(जनोपचार)धन धन गुरुनानक देवजी यांच्या 554 व्या जयंतीनिमित्त श्री गुरुद्वारा गुरु गोविंद सिंह जी महाराज ट्रस्ट खामगाव च्या वतीने भव्य स्वरूपात नगर कीर्तन धार्मिक कार्याचे आयोजन शनिवार दि. २५-११-२०२३ रोजी दुपारी १वा पासून करण्यात आले आहे.
स्थानिक गुरुद्वारा येथून सुरू झालेली मिरवणूक शहरातील पोलीस स्टेशन टावर चौक एकबोटे चौक खामगाव अर्बन बँक फरशी मोहन चौक जगदंबा चौक भारत कटपीस काँग्रेस भवन पासून गुरुद्वारा येथे पोहोचणार आहे. श्री हजुर साहेब नांदेड येथून सुशोभित गुरु ग्रंथ साहेबजी यांची वाहनासह पालखी ,टाळ मृदुंग व नागपूर येथील पारंपारिक शस्त्र कला प्रदर्शनी तसेच औरंगाबाद येथील पूजनीय पंच प्यारे साहेब निशान साहेब नगर कीर्तन मिरवणुकीत मुख्य आकर्षण ठरणार आहे.
तरी भाविक भक्तांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन गुरुगोविंद सिंग जी महाराज ट्रस्टच्या वतीने सहसचिव सरदार कुलबिरसिंघ पोपली यांनी केले आहे
Post a Comment