खामगाव येथील सुटाळपुरा भागातील श्रीमंत श्री शिवाजीराव देशमुख यांचा 500 वर्ष पूर्वीचा गढीवर वाडा आहे. याच वाड्यातील या दालनात राजश्री छत्रपती शाहू महाराज खामगाव येथे बहुजन शिक्षण परिषद साठी आले असता तीन दिवस मुक्कामी होते. या परिषदेच आयोजन राबहादुर केशवराव देशमुख यांनी केले होते. या परिषदेत बहुजनांना शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही असे ऐतिहासिक भाषण राजश्री शाहू महाराजांनी दिले होते व तेथूनच विदर्भात शैक्षणिक क्रांतीची सुरुवात झाली.
![]() |
जाहिरात फक्त शंभर रुपयात संपर्क 820 881 94 38 |
भिंतीवर असलेले राजा रवि वर्माची (1895 सण) हस्ते बनवलेले आणि साक्षांकित केलेली छत्रपती शिवाजी महाराजांचे तैलचित्र आहे. तसेच त्याखाली रावबहादूर केशवराव देशमुख यांचा फोटो आहे फोटोच्या डाव्या बाजूस तत्कालीन व्हाईसरॉय ऑफ इंडिया क्लिप रिचर्ड फोड यांनी केशवराव देशमुख यांना रावबहादुर पदवी देऊन 1 जानेवारी 1917 मध्ये सन्मानित केले होते ती सनद आहे फोटोच्या खाली पूर्वजांची काळातील नूतनीकरण केलेली पगडी व तलवार ठेवलेली आहे या ऐतिहासिक वाड्यात राहण्याचे भाग्य लाभणं म्हणजे अहोभाग्यच आहे
Post a Comment