खामगाव तालुका माहेश्वरी संघटनेच्या वतीने निशुल्क  दंतरोग तपासणी शिबिर  


 खामगाव : खामगाव तालुका माहेश्वरी संघटनेच्या वतीने 24 नोव्हेंबर शुक्रवार रोजी निशुल्क दंतरोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. नटराज गार्डन समोरील

केमिस्ट भवनमधे सकाळी 9 ते दुपारी 3 या वेळात हे शिबीर घेण्यात येणार आहे.


गुजरात येथील प्रसिद्ध दंतरोग तज्ज्ञ हर्षदभाई जोशी आणि श्रीमती सरोजबेन जोशी या शिबिरात रुग्णांची तपासणी करतील तपासणीनंतर पहिल्या शंभर रुग्णांवर उपचार सुद्धा केले जाणार आहेत.

दातांच्या विविध आजारांची तपासणी करून योग्य सल्ला दिला जाणार आहे तसेच रुग्णाच्या संमतीने, जालंधर योग प्रक्रियेद्वारे कुजलेले, फोड आणि तुटलेले दात सहजपणे वेदनाशिवाय काढले जातात.मधुमेह, रक्तदाब आणि हृदयाच्या रुग्णांनी तपासणीपूर्वी डॉक्टरांना कळवावे आणि त्यांच्या जुन्या फाईल्स सोबत आणाव्यात. हे शिबिर खामगाव शहरातील सर्वांसाठी निशुल्क आहे.

माहेश्वरी संघटनेच्या बुलढाणा जिल्हा व विदर्भ प्रदेश अंतर्गत खामगाव तालुका माहेश्वरी संघटनेच्या वतीने हे शिबिर निशुल्क आयोजित करण्यात आले असून रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन खामगाव तालुका माहेश्वरी संघटनेचे अध्यक्ष अनिल चांडक, सचिव नटवर राठी, प्रकल्प प्रमुख सुयोग झवर यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post