लहुजी शक्ती सेनेच्या वतीने क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांची 229 वी जयंती महाकाल चौक खामगांव येथे साजरी


  खामगाव :- कार्यक्रमाचे उद्घाटक विदर्भ प्रांत संयोजक एडवोकेट अमोल भाऊ अंधारे कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सरचिटणीस गौतम भाऊ गवई तसेच प्राध्यापक विजय देशमुख,पवन भाऊ गरड,पवन भाऊ माळवंदे,शिवाजी पोलीस स्टेशनचे ठाणेदार साहेब,थोरात साहेब,देशमुख साहेब,शेळके साहेब,राजपूत साहेब,निलेश बरडिया,बापू करंदीकर, लहुजी शक्ती  सेनेचे तालुका अध्यक्ष अनंता सकळकळे  यांनी क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांचे प्रतिमेचे दीप प्रज्वलन करून अभिवादन केले. मान्यवरांनी क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांचे जीवन चरित्र रेखाटले. यावेळी लहुजी शक्ती सेनेचे ज्येष्ठ नेते महादेवराव आढागळे अशोकराव सावळे लहुजी शक्ती सेनेचे युवा तालुका अध्यक्ष संजय पाटोळे सर, उप तालुका अध्यक्ष गोपाल भालेराव,नितीन सोनवणे शहराध्यक्ष,राम नाटेकर युवा शहराध्यक्ष,आशु खंडारे कोर कमिटी अध्यक्ष, अंबादास सोनावणे,लखन सोनवणे,देवा वाकोडे,गजानन सोनवणे,संजय सोनवणे,सागर पाटोळे,संजय चांदुरकर,विशाल खंडारे,युवराज अंभोरे,राहुल अंभोरे,समाधान साठे व बहुसंख्येने मातंग उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post