अवकाळी पाऊस आणि गारपीटी मुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान!


 खामगाव(प्रतिनिधी) - खामगाव आणि शेगाव तालुक्यामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीटी मुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून गारपिटीमुळे खामगाव तालुक्यातील शिराळा येथील मेंढपाळाचे 20 मेंढ्या तर शेगाव तालुक्यातील टाकळी विरो येथील मेंढपाळाचे सात ते आठ मेंढ्या ठार झाल्याची घटना समोर आली आहे.

*नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने पुढील पाच दिवसांचा वर्तवलेला अंदाज‌*

26 नोव्हेंबरच्या रात्री अवकाळी पावसासह गारपीट झाल्यामुळे खामगाव तालुक्यातील शिराळा येथील शेतकरी मेंढपाळ सैलानी कृष्णाजी हटकर यांच्या 20 मेंढ्या ठार झाल्या यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच शेगाव तालुक्यातील टाकळी विरो येथे सुद्धा गारपिटीमुळे मेंढ्या ठार झाल्याची घटना समोर आली असून शेगांव तालुक्यातील टाकळी विरो येथील शेतकरी पुंजाजी काळे यांच्या शेतात मेंढपाळ कुटुंब संतोष हनुवती हटकर वास्तव्यास आले होते परंतु रात्रीच्या अवकाळी पावसाने व गारपिटीने अनेक मेंढ्या दगावल्या आहेत, अद्याप पर्यंत पंचनामा झालेला नसून मेंढपाळ बांधवांवरती अस्मानी संकट कोसळले आहे, हवालदिल झालेल्या शासनाच्या मदतीची गरज आहे, सुस्तावलेल्या प्रशासनामुळे अद्याप पर्यंत पंचनामे न झाल्याने मेंढपाळ कासावीस झालाय, शासनाने व प्रशासनाने ताबडतोब याची दखल घेऊन गोरगरीब मेंढपाळांना न्याय द्यावा अशी माफक अपेक्षा मेंढपाळांकडून होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post