मंगळवारी मराठा पाटील सेवा मंडळाचा दसरा मेळावा: उपस्थित राहण्याचे आवाहन
खामगाव - दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा मराठा पाटील सेवा मंडळाचा दसरा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.२४ सप्टेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजता शेगाव रोडवरील पाटील टेकडी येथे संपन्न होणाऱ्या मेळाव्याला समाज बांधवांनी उपस्थित राहून एकमेकांच्या भेटी गाठी घ्याव्या असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर (बंडूभाऊ) लांजुळकर सचिव आशुतोष लांडे यांनी केले आहे अशी माहिती नितेश मानकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकानवये दिली.
Post a Comment