विद्यापीठ कलाविश्वाच्या आसमंतात "शिवाजी विज्ञान" चीच तिसऱ्यांदा विज

 

वैज्ञानिकांमधील कलागुण जोपासणाऱ्या हिऱ्यांना पैलू पाडून कलोपासक घडविणारे श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय, अमरावती



अमरावती:-संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती च्या वतीने आयोजित युवा महोत्सव २०२३ मध्ये पुन्हा एकदा श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय अमरावतीच्या चमूने विजेता पटकावत चॅम्पियन ट्रॉफी वर आपले नाव कोरले. संपूर्ण विद्यापीठात सर्वाधिक 12 विविध कलाप्रकारांमध्ये या महाविद्यालयाने पारितोषिके मिळवली आणि चक्क तिसऱ्यांदा संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या युवा महोत्सवात चॅम्पियन ठरून इतिहास रचला.


संपूर्ण चमूतील प्रत्येक विद्यार्थ्यांचा या यशात सिंहाचा वाटा आहेच, तथापि कु रुद्राणी बारब्दे, कु अनुष्का ठाकरे, श्री आदित्य ताजनेकर, श्री तेजस दिवे, कु. वेदिका शिरभाते या विद्यार्थ्यांच्या अतुलनिय सादरीकरणांमुळे विजेता चषक महाविद्यालयास प्राप्त झाला - प्रा. डॉ. रुपाली टोणे-इंगोले, युवा महोत्सव समन्वयक



श्री राम मेघे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च बडनेरा येथे दिनांक १० ते १३ ऑक्टोबर २०२३ दरम्यान विद्यापीठाचा युवा महोत्सव पार पडला. यात एकूण २७ कलाप्रकारांपैकी श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय, अमरावतीने ५ कलाप्रकारांमध्ये प्रथम ३ कलाप्रकारांमध्ये द्वितीय तर ४ कलाप्रकारांमध्ये तृतीय स्थान प्राप्त केले. विद्यार्थ्यांनी पोस्टर मेकिंग, इन्स्टॉलेशन, क्ले मॉडेलिंग, स्पॉट फोटोग्राफी आणि कोलाज या कला प्रकारात प्रथम, ऑन द स्पॉट पेंटिंग, ऍलोकेशन, मिमिक्री या कलाप्रकारात द्वितीय तर भारतीय समूह गान, वेस्टर्न सोलो, वेस्टर्न इन्स्ट्रुमेंटल, आणि प्रश्नमंजुषा या कलाप्रकारात तृतीय स्थान प्राप्त केले.


 

साधारणपणे विज्ञानाच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणारे आणि विकसन होण्यासाठी पोषक वातावरण मिळणे अत्यंत आवश्यक असते. त्या दृष्टीने महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विशेष प्रयत्न करतात. त्यामुळेच विद्यार्थ्यांना विविध संधी उपलब्ध होतात व त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालय मोलाची भूमिका बजावू शकते - प्राचार्य डॉ जी व्ही कोरपे


सन २०१९ आणि सन २०२२ या वर्षात सुद्धा श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय अमरावतीची चमू चॅम्पियन ठरली होती हे उल्लेखनीय. विद्यार्थ्यांनी अत्यंत शिस्तबद्ध योजना, सातत्य आणि सराव आणि सर्जनशीलता यांचे साहाय्याने हे देदीप्यमान यश मिळविले आहे.


 


श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय, अमरावती तर्फे विद्यार्थ्यांना त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी वर्षभर सर्वतोपरी मार्गदर्शन व सहाय्य करण्यात येते. सांस्कृतिक साहित्यिक आणि कला प्रकारात निष्णात असलेल्या तज्ञ मार्गदर्शकांची नेमणूकही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी करण्यात येते. याच कारणामुळे केवळ विज्ञान शाखा असलेल्या या महाविद्यालयातील विद्यार्थी कला, सांस्कृतिक, क्रीडा आणि साहित्यिक क्षेत्रात चमकदार कामगिरी करून विद्यापीठ, राज्य तथा राष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धांमध्ये पारितोषिके प्राप्त करून महाविद्यालयाच्या गौरवात भर घालतात.





श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष श्री हर्षवर्धनजी देशमुख या मार्गदर्शनात संपूर्ण कार्यकारी मंडळाच्या सदस्यांच्या प्रेरणेने महाविद्यालयाने हे यश संपादन केले आहे. श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ जी व्ही कोरपे, युवा महोत्सव समिती समन्वयक डॉ रूपाली टोणे इंगोले प्रा. डॉ दिनेश खेडकर, डॉ मनीष श्रीहरी गायकवाड, डॉ. स्वप्निल अडसड, डॉ. सुगंध बंड, डॉ. हर्षाली वानखडे, डॉ. दिपाली राठोड, डॉ. अविनाश दारशिंबे, डॉ. वंदना खोब्रागडे, डॉ अवंतिका मानकर, डॉ कुणाल घोडेस्वार आदी युवा महोत्सव समिती सदस्यांनी विद्यार्थ्यांसाठी विशेष मेहनत घेतली. डॉ चंद्रकांत शिंदे, श्री प्रकाश मेश्राम आणि श्री प्रशांत ठाकरे यांचे विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन लाभले.



श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय अमरावतीचे आयक्यूएसी समन्वयक प्रा डॉ. वामन बरडे, प्रा. डॉ.प्रमोद पडोळे प्रा डॉ. गजानन वाघ, डॉ.संगीता इंगोले, डॉ. श्रुती इंगोले, व्यक्तिश: बक्षीस वितरण कार्यक्रमास उपस्थित राहून कौतुक केले तर संपूर्ण महाविद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी देखील विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे

Post a Comment

Previous Post Next Post