रोटरी क्लब व सिल्व्हरसिटी मल्टीस्पेशॅलिटी हॉस्पिटलयांचे संयुक्त विद्यमाने "व्हेरिकोज व्हेन्स चेकअप कॅम्प" चे आयोजन


खामगाव जनोपचार -आपल्या शरीरात अशुद्ध रक्तवहन करण्यासाठी व्हेन्स म्हणजे शीरा असतात. पायात अशुद्ध रक्त वहन करण्यासाठी त्वचेच्या खाली मुख्यतः दोन मोठ्या रक्तवाहिन्या असतात. या रक्तवाहिन्यांमध्ये जर कुठल्या कारणाने रक्त जमा झाले आणि त्यामुळे त्या फुगीर झाल्या तर या त्रासाला व्हेरिकोज व्हेन्स (varicose veins) म्हणजे मराठीत 'अपस्फित नीला' असे म्हणतात. अनेकदा या रक्तवाहिन्या पायाच्या पृष्ठभागावर ठळकपणे दिसू लागतात. बरेचदा रक्तवाहिन्या दिसत नसल्या तरी व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास असू शकतो. त्यासाठी अन्य लक्षणांचा आढावा घेणे आवश्यक असते. यामध्ये पायाच्या ज्या क्षेत्रात याचा प्रादुर्भाव होतो त्या ठिकाणी नसा  फुगतात व ठळकपणे पायांवर उभारून दिसतात, तसेच ब-याच वेळ उभे राहिल्या पायांमध्ये वेदना होण्यास सुरुवात होते. गुडघ्यांमध्ये पायाचा अल्सर होऊ शकतो, प्रभावित नसांमध्ये खाज येणे आणि जळजळ होणे, तळव्यांमध्ये सूज येणे व तळवा  दुखणे अशी लक्षणे प्रामुख्याने दिसून येतात.

जाहिरात फक्त ९९ रुपयात
संपर्क 820 881 94


या समस्यांवर उपायदेखील मोठ्या शहरांमध्येच उपलब्ध असल्यामुळे रुग्णांना एकतर आर्थिक भार सोसावा लागतो किंवा आयुष्यभर त्रास सहन करावा लागतो. हे लक्षात घेऊन रोटरी क्लब खामगांवने सिल्व्हरसिटी मल्टी स्पेशॅलिटी हॉस्पिटल खामगांव यांचे सहकार्याने संयुक्तपणे येत्या रविवारी म्हणजे दिनांक २२ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत "व्हेरिकोज व्हेन्स चेकअप कॅम्प" चे आयोजन केलेले आहे. या शिबिरात सुप्रसिद्ध तज्ञ डॉ पंकज बानोडे (वर्धा) हे उपस्थित राहणार असून ते सर्व रुग्णांना तपासून त्यांना योग्य तो औषधोपचार प्रदान करणार आहेत.सदर शिबिराची नोंदणी फी ५०/- एवढी नाममात्र असून त्याकरिता रुग्णांनी मोबाईल क्रमांक ९१४६१८५६११ वर संपर्क साधावा असे आवाहन क्लब अध्यक्ष रो सुरेश पारीक, मानद सचिव रो आनंद शर्मा, प्रकल्प-प्रमुख रो कौस्तुभ मोहता व सह प्रकल्प-प्रमुख रो विशाल गांधी यांनी केलेले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post