राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव शनिवारी
खामगाव: श्री विजयादशमीच्या पावनपर्वावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ खामगाव नगरच्या वतीने २१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता स्थानिक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक नगर परिषद शाळा क्रमांक 6 च्या मैदानावर आयोजित केला आहे. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी मा.श्री.प्रमोद रामराव पाटील विश्वस्त, जागृती आश्रम, शेलोडी तर प्रमुख वक्ते मा. श्री.अतुलजी मोघे विदर्भ प्रांत कार्यवाह रा.स्व.संघ, यांची उपस्थित राहणार आहे. तसेच न.प.शाळा क्र.६ च्या मैदानावरून सायंकाळी ४.30 मिनिटांनी पथसंचलन शहरातील प्रमुख मार्गावरून निघणार आहे. तरी सर्व स्वयंसेवकांनी पूर्ण गणवेशात दंडासह वेळेपूर्वी उपस्थित राहावे असे आवाहन नगर संघ चालक प्रल्हाद निमकंडे यांनी केले आहे.
Post a Comment