सामान्य ज्ञान परीक्षेमध्ये जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलर्स च्या विद्यार्थ्यांचे सुयश


खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क:-  ३० सप्टेंबर २०२३ रोजी स्वामी विवेकानंद सेवा संस्था खामगाव द्वारा आयोजित स्वामी विवेकानंद चरित्र व संदेश विषयावर भव्य सामान्य ज्ञान स्पर्धेचा निकाल ०८ ऑक्टो २०२३ रोजी लागला .या स्पर्धेमध्ये जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलर्स अँड ज्यु कॉलेज आवार च्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन उच्च यश संपादन केले. या स्पर्धेमध्ये तालुका स्तरातून १४०० विद्यार्थी सहभागी होते .


या स्पर्धेमध्ये अ गट मधून प्रथम क्रमांक मिळवलेल्या कू.प्रगती मेतकर व ब गट मधून प्रथम क्रमांक मिळवलेल्या कू नियती गव्हांदे या विद्यार्थिनींचा त्यांच्या पालकासमवेत  शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेचे प्राचार्य श्री.डी.एस जाधव सर यांनी स्पर्धेबदल विस्तृत माहिती दिली.त्यानंतर  शाळेचे अध्यक्ष प्रा श्री रामकृष्ण गुंजकर सर व शाळेच्या सचिवा प्रा सौ सुरेखाताई गुंजकर यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थीनीचा  व त्यांच्या पालकांचा पुष्पगुच्छ तसेच पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला.

स्वामी विवेकानंद व त्यांचे साहित्य व विचार हे आजच्या पिढीला अतिशय प्रेरणादायी आहे, ते वाचण्यासाठी दिवस कमी पडतात एवढे त्यांचे साहित्य व विचार आहे, समाजाने व विशेष करून विद्यार्थ्यांनी अंगीकार करावा.असे मार्गदर्शन प्रा.श्री गुंजकर सर यांनी विद्यार्थ्यांना केले. यावेळी सर्व विद्यार्थी व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांची विशेष उपस्थिती होती.

Post a Comment

Previous Post Next Post