नॅशनल हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांची सभा ऊत्साहात संपन्न
खामगांव जनोपचार न्यूज नेटवर्क :- येथील नामांकित अरजन खिमजी नॅशनल हायस्कूल व ज्यु. कॉलेज या शैक्षणिक संस्थेला १९४२ पासून आजपर्यंत उत्कृष्ठ दर्जाची शैक्षणिक परंपरा लाभलेली आहे. अशा या संस्थेचे हजारो विद्यार्थी खामगांवात, जिल्ह्यात, राज्यात भारतात व किंबहुना संपूर्ण जगात विविध ठिकाणी उच्च पदावर कार्यरत आहेत.
अशा या सर्व माजी विद्यार्थ्यांना एकत्र आणून माजी विद्यार्थी संघटना नॅशनल हायस्कूल खामगांव तयार करण्याच्या उद्देशाने रविवार दि. १७/०९/२०२३ रोजी सकाळी ११ वा. अ. खि. नॅशनल हायस्कूल खामगांव येथे माजी विद्यार्थ्यांची सभा नॅशनल एज्यु. संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. प्रविणजी चोपडा, प्राचार्या डॉ. सौ. प्रविणा शहा यांच्या विशेष उपस्थितीत संपन्न झाली. मंचावर शाळेचे माजी विद्यार्थी डॉ. अशोक बावस्कर, डॉ. पंकज मंत्री, छ. संभाजीनगर येथून आलेले माजी विद्यार्थी श्री. सुरेश बोचरे, शाळेचे उपप्राचार्य श्री. हेरंब दिगंबर इ. उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दिप प्रज्वलनाने झाली. उपस्थित सर्व माजी विद्यार्थ्यांनी आपला स्वपरिचय दिला. त्यानंतर मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. डॉ. पंकज मंत्री यांनी स्वागतपर भाषणात उपस्थितांचे स्वागत केले. डॉ. अशोक बावस्कर यांनी आपल्या भाषणात अ. खि. नॅशनल हायस्कूल व ज्यु. कॉलेज च्या गौरवशाली परंपरेची माहिती दिली. या विद्यालयातून १० व १२ वी उत्तीर्ण होऊन अनेक विद्यार्थी देशात व विदेशात उच्च पदावर कार्यरत आहेत. अशा सर्व माजी विद्यार्थ्यांना एकत्र आणण्याचा मानस व त्यासाठी होत असलेल्या प्रयत्नांची विस्तृत माहिती याप्रसंगी दिली. उपस्थित सर्व माजी विद्यार्थ्यांच्या प्रयत्नातून अ. खि. नॅशनल हायस्कूल व ज्यु. कॉलेजच्या माजी विद्यार्थी मंडळाची स्थापना करण्याचे ठरले. त्यासाठी आवश्यक असलेली नोंदणी प्रक्रिया व त्यासंबंधीत इतर बाबींवर चर्चा करण्यात आली. त्यासाठी २१ सदस्यांची सुकाणू समिती तयार करण्यात आली. ही समिती चर्चा करुन पुढील नोंदणी प्रक्रिया पूर्ण करेल असे ठरले. सोबतच दिवाळीनंतर लगेचच शनिवार दि. १८ नोव्हेंबर २०२३ रोजी नॅशनल हायस्कूल खामगांव येथे सर्व माजी विद्यार्थ्यांचा मेळावा घेण्याचे ठरले. श्री. सुरेश बोचरे यांनी याप्रसंगी शाळेतील आपल्या सुखद आठवणींना उजाळा दिला.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष व माजी विद्यार्थी श्री. प्रविण चोपडा यांनी या उपक्रमास शुभेच्छा देऊन संस्थेच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य करण्याचे सांगितले. प्राचार्या डॉ.सौ. प्रविणा शहा यांनी आपल्या भाषणात संस्थेच्या वाटचालीचा इतिहास सांगितला व विद्यार्थ्यांसाठी सुरु असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. माजी विद्यार्थ्यांनी शाळेला सर्वतोपरी मदत करुन विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी माजी विद्यार्थी मंडळ कार्य करेल असे मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचलन अॅड. अनिल व्यास व आभार प्रदर्शन डॉ. चंद्रकांत जाधव यांनी केले. या कार्यक्रमास खामगांव व बाहेर गावावरुन आलेले बरेच विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माजी विद्यार्थी डॉ. अशोक बावस्कर, डॉ. पंकज मंत्री, अॅड. अजय आळशी, अॅड. अनिल व्यास, डॉ. चंद्रकांत जाधव, श्री. प्रविण जमधाडे, श्री. हेरंब दिगंबर, श्री. बळीराम वानखडे, श्री. नितेश मानकर यांनी परिश्रम घेतले असे एका प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.
Post a Comment