नॅशनल हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांची रविवारी सभा
खामगांव येथील नामांकित अरजन खिमजी नॅशनल हायस्कूल व ज्यु. कॉलेज ही शैक्षणिक संस्था १९४२ पासून आजपर्यंत उत्कृष्ठ दर्जाची शैक्षणिक परंपरा लाभलेल्या या संस्थेचे हजारो विद्यार्थी खामगांवात, जिल्ह्यात, राज्यात भारतात व किंबहुना संपूर्ण जगात विविध ठिकाणी उच्च पदावर कार्यरत आहेत.
आपल्या आयुष्यात आपण संगळ्यांच काही ना काही देणं लागतो. आपण जन्म घेतो त्या मातीचं, आपल्या कुटुंबाचं आणि शिकतो त्या शाळा कॉलेजचं. एक सुजान नागरिक बनण्याच्या प्रवासातील एक पायरी म्हणजे आपली शाळा. या शाळेतून माध्यमिक शालांत व कनिष्ठ महाविद्यालयीन परिक्षा उत्तीर्ण करुन बाहेर पडलेल्या व आज सर्वदूर आपआपल्या क्षेत्रात कार्य करत असलेल्या सर्व माजी विद्यार्थ्यांना असे आवाहन करण्यात येते की, रविवार दि. १७/०९/२०२३ रोजी सकाळी ११ वा. अ. खि. नॅशनल हायस्कूल खामगांव येथे माजी विद्यार्थ्यांची सभा प्राचार्या डॉ. सौ. प्रविणा शहा यांच्या विशेष उपस्थितीत आयोजित केली आहे. तरी अ. खि. नॅशनल हायस्कूल व ज्यु. कॉलेजच्या सर्व माजी विद्यार्थ्यांना ह्या सभेस उपस्थित राहून आपल्या सूचना, मार्गदर्शन करावे असे आवाहन नियोजित माजी विद्यार्थी मंडळ, नॅशनल हायस्कूल खामगांवचे वतीने निमंत्रक डॉ. अशोक बावस्कर (मो. ९४२२१८०९०८), डॉ. पंकज मंत्री (मो. ९४२२८८०६६६), अॅड. अजय आळशी (मो. ९२८४२४१५७७), अॅड. अनिल व्यास (मो. ९८२२६४०९४८), श्री. विरेंद्र शहा (मो. ९४२२११५९६९) यांनी एका प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.
Post a Comment