भेदभाव नष्ट करण्यासाठी महोत्सव रामबाण उपाय: जयंत नाईकनवरे
खामगाव: समाजातील भेदभाव नष्ट् करण्यासोबतच सामाजिक अंतर कमी करण्यासाठी संत आणि महापुरूषांनी विविध सण महोत्सवांच्या परंपरा सुरू केल्या आहेत. खामगाव महोत्सव हा आगामी काळात मनभेद दूरकरण्यासाठी मैलाचा दगड ठरेल, असे प्रतिपादन विशेष पोलीस महानिरिक्षक जयंत नाईकनवरे यांनी येथे केले.
खामगावकरांनी खामगावरांसाठी सुरू केलेल्या श्री खामगाव महोत्सवाचे सोमवारी सायंकाळी थाटात उद्घाटन झाले. त्यावेळी ते उद्घाटक म्हणून बोलत होते. प्रसिध्द कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या कीर्तनाने या महोत्सवाला सुरूवात झाली. महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदान हाऊसपॐुल्ल झाले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामदादा मोहीते होते. उद्घाटक म्हणून विशेष पोलीस महानिरिक्षक जयंत नाईकनवरे, आ.ॲड. आकाश पॐुंडकर, िजल्हा पोलीस अधिक्षक सुनिल कडासने, अपर पोलीस अधिक्षक अशोक थोरात, उपविभागीय पेालीस अधिकारी विनोद ठाकरे, पाटील, एलसीबी पीआय अशोक लांडे, एएसपी महामुनी, वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने, डॉ. वकारउल हक, भाजप मिडीया सेलचे सागर पॐुंडकर, खामबाव अर्बन बॅकेचे आशीष चौबीसा, ओकंारआप्पा तोडकर, राजेश झापर्डे, संयोजक अमोल अंधारे यांची उपस्थिती होती. यावेळी आमदार ॲड. आकाश पॐुंडकर, जिल्हा पोलीस अधिक्षक सुनिल कडासणे, अशोक सोनोने, वकारउल हक यांचीही समायोचित भाषणे झालीत. व्यासपीठावरील मान्यवरांचे किशोर गरड, राजेश झापर्डे, अमोल अंधारे, विवेक मोहता, संतोषसेठ डिडवाणीया, चंद्रकुमार मोहता, गोपाल अग्रवाल, राजेंद्र नहार, अनिस जमादार, भगवान बरडे, परवेज पठाण, बापु करंदीकर, पत्रकार राजेश राजोरे, िकरण रेठेकर यांनी स्वागत केले.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला सोनल, पूनम, मिलाली पुरोहित यांनी गणेश वंदना सादर केली. प्रास्ताविक ॲड. अमोल अंधारे यांनी केले. यावेळी यांची उपस्थिती होती. संचालन डॉ. अशोक बावस्कर यांनी केले. आभार राजेश झापर्डे यांनी मानले.
Post a Comment