रोटरी क्लब खामगांव ने घेतली आदिवासी लोकांच्या आरोग्याची काळजी


 खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क: बुलढाणा जिल्हा हा एक मागासलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि त्यातला त्यात घाटाखालील विशेषतः सातपुडा पर्वत रांगेतील जळगांव जामोद परिसर हा आदिवासी प्रदेश म्हणून ओळखल्या जातो, ज्याठिकाणी अजूनही भौतिक सुविधांचा अभाव आढळतो. त्यातल्या त्यात वैद्यकीय  सुविधा तर खूपच कमी असल्याच्या प्रकर्षाने जाणवतात.


हे सगळं लक्षात घेऊन रोटरी क्लब खामगांवद्वारे सिल्वरसिटी मल्टीस्पेशॅलिटी हॉस्पिटल व जय आदिवासी युवा शक्ती ग्रुप जळगांव जामोद यांच्या सहकार्याने रविवारी म्हणजेच १७ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी १० ते दुपारी २ या दरम्यान एका भव्य रोगनिदान शिबिराचे आयोजन उमापूर (तालुका जळगांव जामोद) येथे करण्यात आले होते. या शिबिरात एकाच छताखाली रूग्णांना विविध क्षेत्रातील निष्णात डॉक्टर्सच्या वैद्यकीय सेवा व उचित असे मार्गदर्शन लाभले. या शिबिरात हृदयरोग, स्त्री विकार, लिव्हर व पोटविकार, सौंदर्य व चर्मरोग, ऑर्थोपेडिक, फिजिओथेरपिस्ट विषयाशी संबंधित तज्ञ डॉक्टरांच्या सेवा लाभल्या जसे की डॉ आनंद राठी, डॉ परीक्षित मानकर, डॉ समृद्धी मेंढे, डॉ अनिकेत मेंढे, डॉ चेतन सातोटे, डॉ पराग महाजन, डॉ निखिल खंडारे, डॉ प्रतीक मोहता, डॉ ईशा मोहता व डॉ प्रमोद बंड यांच्या सेवा सर्व रुग्णांना एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. स्थानिक डॉ सतीश शिरीकर यांचे विशेष सहकार्य लाभले. महाराष्ट्र मेडिकल असोशिएशनचे सचिव श्री अनिलजी नावंदर यांनी शिबिरासाठी लागणा-या सर्व औषधी मोफत उपलब्ध करून दिल्या होत्या त्याबद्दल त्यांचे विशेष आभार व्यक्त करावे लागेल.

या शिबिरात सुमारे २०० रूग्णांनी आपला सहभाग नोंदविला. सदर भव्य शिबिराच्या यशस्वीतेसाठी प्रकल्पप्रमुख वास्तुतज्ञ रो पंकज अग्रवाल, सह-प्रकल्पप्रमुख रो नकुल अग्रवाल, क्लब अध्यक्ष रो सुरेश पारीक व क्लब सचिव रो आनंद शर्मा यांचेसह पूर्वाध्यक्ष रो देवेश भगत, रो प्रफुल अग्रवाल, पत्रकार मंजितसिंह शीख, रो विजय पटेल, रो किशन मोहता, रो विनय मोहनानी, रो पंकज अग्रवाल (मधुबन), रो समीर संचेती, रो सुशांतराज घवाळकर व इतर रोटरी क्लब सदस्यांनी आणि सिल्वरसिटी मल्टीस्पेशॅलिटी हॉस्पिटलचे डॉक्टर्स आणि सहायक कर्मचारी यांनी अथक प्रयत्न केले. भविष्यातही असे शिबीर पुनःश्च आयोजित करण्यात यांवे अशी विनंती अनेक स्थानिक नागरीकांनी रोटरी क्लब खामगांवकडे केलेली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post