माजी नगरसेविका भाग्यश्री मानकर यांच्या पुढाकारातून.....

दादा दादी पार्क मधील झाडे झुडपे काढली: नागरिकांनी मानले आभार


माजी नगरसेविका भाग्यश्री मानकर यांच्या पुढाकारातून दादा दादी पार्क मधील झाडे झुडपे काढून स्वच्छता करण्यात आली. 30 ऑक्टोंबर 2022 रोजी वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत मुक्तानंद नगर येथील खुल्या जागेवर विशेष प्रयत्न करून साकार झालेल्या दादा दादी पार्क मध्ये गवत आणि झोपे वाढली होती. त्यामुळे वृद्धांना या ठिकाणी बसणे दुरापास्त झाले होते.


नागरिकांची व विशेषता ज्येष्ठांचे अडचण जाणून माजी नगरसेविका भाग्यश्री मानकर यांनी आज नगरपालिकेचे कर्मचारी लावून पार्कमधील झाडे झुडपे व गवत काढण्यास सुरुवात केली. परिसरातील नागरिकांच्या कामाला प्रथम क्रमांक देत मानकर  ह्या नेहमी सामाजिक कार्याला दुजोरा देत असतात. आज त्यांच्या प्रयत्नातून दादा दादी पार्कची सफाई करण्यात आल्यामुळे नागरिकांनी त्यांचे आभार व्यक्त केले.

Post a Comment

Previous Post Next Post