खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क:- महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटन द्वारा नुकतीच खामगाव येथे बैठक घेण्यात आली. या बैठकीत जिल्हाध्यक्ष म्हणून सचिन डूबल तर जिल्हा सचिव म्हणून सुनील थोरात यांची सर्वानुमते निवड करण्यात आली . माजी जिल्हाध्यक्ष अनिल तायडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या या बैठकीत खामगाव विभागीय अध्यक्ष म्हणून संगम वानखडे तर सचिव पदी संतोष सोनवणे यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी पी एल हेलोडे,डॉ. प्रमोद अंभोरे, सिद्धोधन दारोकार, अविनाश भागवत यांच्यासह संघटनेतील पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते
Post a Comment