खामगाव तालुक्यातील समस्या घेऊन गावकरी व शेतकरी भूमिपुत्र यांच्या दरबारी.
शहापूर गावच्या ग्रामस्थांनी भूमिपुत्र खासदार *मा. प्रतापराव जाधव* साहेब यांची भेट घेऊन आपल्या अळी अडचणी सांगितल्या.प्रामुख्याने शहापूर येथे भोई समाज बांधव व बेलदार समाज बांधव ज्या वस्तीमध्ये राहतात.
तिथे त्यांना कुठलंही कार्य करण्यात करीता मंदिर किंवा सभागृह नसल्याकारणाने खूप मोठ्या अडीअडचणीचा सामना करावा लागतो याकरिता आपण सभागृह उपलब्ध करून द्यावे.तसेच एका सातबारा मध्ये सोडा हिस्से असल्याकारणाने त्यांना शासनाची कुठलीच मदत मिळत नाही व वाटणी पत्र करण्याकरिता सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात अडचणीला सामोरे जावं लागत आहे.याकरिता आपण मदत करावी व काहींचे शेत रस्त्याच्या अडचणी होत्या या सर्व सोडविण्याची आश्वासन शिवसेना नेते खासदार प्रतापराव जाधव यांनी दिले. प्रसंगी उपस्थित.शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र बघे,युवा सेनेचे अमोल भाऊ फेरंग, शिवसेना सोशल मीडिया तालुका,सोपान वाडेकर,लक्ष्मण काकडे, मंगेश इंगळे,नारायण गावंडे, शेख अनिस,दिनेश मेसरे, विनोद इंगळे, शामराव विटे, प्रमोद श्रीनाथ,विकेश चौरे , जगदीश इंगळे, किसन रावणचौरे ,संतोष मेसरे , संतोष वाडेकर, फकीरा इंगळे, गजानन मेसरे, एकनाथ भारसाकळे, अंकुश रताळे, बळीराम चौरे,रमेश मेसरे,आदीं उपस्थित होते.
Post a Comment