वंचित आघाडीच्या शहराध्यक्षपदी नितीन शर्मा यांची वर्णी लागणार!
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क:- वंचित बहुजन आघाडीच्या शहराध्यक्षपदी नितीन शर्मा यांची वर्णी लागणार असल्याची विश्वासनीय माहिती मिळाली आहे. जिल्हाध्यक्ष गणेश भाऊ चौकसे यांच्या मार्गदर्शनात त्यांनी अनेक सेवाभावी उपक्रम राबविले आहेत.
शर्मा यांनी खामगाव शहरात अनेक सेवाभावी कार्य हिरिरीने पार पाडले आहेत . रुग्णांच्या सेवा पासून मंडळाच्या माध्यमातून विविध उपक्रम त्यांनी केले आहेत जनजागृतीचे कार्य जोपासत त्यांची वंचित बहुजन आघाडीच्या खामगाव शहराध्यक्षपदी नियुक्ती होणार आहे अशी विश्वासनीय माहिती मिळाली आहे.
Post a Comment