सफाई कर्मचाऱ्यांना राखी बांधून रक्षाबंधन उत्सव साजरा
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क:- वार्डातील प्रत्येकाच्या सुखदुःखात आपुलकीने सहभागी होणाऱ्या माजी नगरसेविका भाग्यश्री मानकर यांनी समाज घटकातील सामाजिक दायित्व म्हणून भाजी विक्रेत्या पासून सफाई कर्मचाऱ्यांपर्यंत भावांना राखी बांधून हा उत्सव साजरा केला.
गेल्या दोन दिवसापूर्वी त्यांनी खामगाव शहरातील भाजी विक्रेते, फळ विक्रेते यांच्यासह छोट्या व्यावसायिकांना राखी बांधून कृतज्ञता व्यक्त केली तर काल त्या ज्या वार्डातून निवडून आल्या होत्या त्या प्रभागातील वार्डप्यून व सफाई कर्मचाऱ्यांना राखी बांधून बहीण भावाच्या अतूट नात्याला उजाळा दिला. त्यांच्या या उपक्रमामुळे नागरिक व सफाई कर्मचाऱ्यांनी आभार व्यक्त केले.
![]() |
जाहिरात |
Post a Comment