संत निरंकारी मंडळ च्या रक्तदान शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क:- संत निरंकारी मंडळ खामगांव तर्फे आज भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले.संत निरंकारी सत्संग भवन, घाटपुरी बायपास, खामगांव घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात पुरुष व महिलांनी ऐच्छिक मतदान केले
सद्गुरू माता सुदीक्षाजी यांच्या मार्गदर्शनाखाली संपुर्ण भारतात संत निरंकारी मंडळामार्फत रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात येत असते. त्याचा अनुषंगाने आज खामगांव ब्रँच चे संतोष शेगोकार अजय छतवाणी शिवाजीराव पाटील हसानंद छतवानी ठाणेदार अरुण परदेशी यांच्या प्रमुख उपस्थितीत रक्तदान शिबिराला सुरुवात करण्यात आली.रक्तदान म्हणजे जीवनदान- वाचवी रुग्णाचे प्राण हा नारा देत रक्तदात्यांनी रक्तदान शिबीरात सहभाग नोंदविला.
शिबिराला यशस्वी करण्याकरिता अकोला व खामगाव शासकीय रुग्णालयाचे एस पी जोशी श्रीमती डॉक्टर प्रणाली देशमुख ,श्रीमती चित्रा देशपांडे , पुरुषोत्तम हिंगणकार, कमल शिंदे, अशोक पराते, विष्णू मुंडे यांनी सेवा दिली
Post a Comment