शेगाव शहर पोलिसांनी वैभव हॉटेल येथील कुंटण खाण्यावर घातला छापा
शेगाव :- काल दिनांक १० ऑगस्ट रोजी गुप्त बातमी धारामार्फत बातमी मिळाली की संत गजानन महाराज मंदिर परिसरात असलेल्या वैभव हॉटेल येथे कुंटणखाना सुरू असून त्यावर महिलांकडून देहव्यापार करउन घेतला जातो अशी खात्री लायक बातमी मिळाल्याने शेगाव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनील अंबुलकर यांनी बनावट ग्राहक पाठवून खात्री केल्यानंतर स्टाफ सह सदर ठिकाणी छापा घातला असता त्या ठिकाणी दोन पिडीत महिला मिळून आल्या व त्या ठिकाणी आकाश राजेश देशमुख आणि पप्लू उर्फ आनंद गुजर हे कुंटणखाना चालवत असल्याचे निष्पन्न झाले आहे त्यांचे विरुद्ध पोलीस स्टेशन शेगाव शहर येथे अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम कलम 3,4,5,7 अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
सदर कारवाई माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री अशोक थोरात सर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी खामगाव श्री विनोद ठाकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शेगाव शहर चे ठाणेदार सुनील अंबुलकर पोलीस उपनिरीक्षक राहुल कातकडे पोलीस उपनिरीक्षक मनोज वासाडे , पोलीस उपनिरीक्षक सरिता कुवरे , पोहेका विशाल माने, पोलीस नाईक राहुल पांडे ,पोलीस कॉन्स्टेबल विजय साळवे, अमोल वनारे ,महिला पोलीस शितल कपाटे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी खामगाव कार्यालयाचे पोलीस नाईक सुधाकर थोरात ,लासुरकर, योगेश कुवारे, महिला पोलीस प्रतीक्षा जाधव यांनी केली आहे.
Post a Comment