उपासना केल्यावर ईश्वर प्राप्त होतात- कल्याण आचार्य
खामगाव:- मनोभावे उपासना केल्यावर ईश्वर प्राप्त होतात उपासनेत कुठलाही भेदभाव नसतो उपासना करताना श्रीमंती गरिबी अथवा श्रेष्ठ कनिष्ठ हा भेट नसतो उपासने फार मोठी शक्ती आहे असे भगवताचार्य कल्याण रामदास पंत आचार्य यांनी आपल्या अमृतवाणीतून श्रीमद् भागवत कथेतून व्यक्त केले अधिक मासानिमित्त प्रल्हाद महाराज राम मंदिर यांच्या वतीने श्रीमद् भागवत कथा ज्ञान यज्ञाचे आयोजन येथील देशमुख मंगल कार्यालय येथे दिनांक 2 ऑगस्ट ते 8 ऑगस्ट पर्यंत आयोजित करण्यात आले .
कथेचे वाचन करताना श्री कल्याण आचार्य हे वराह अवतार ,कपिल चरित्र ,धृत चरित्र यावर कथेचे वाचन करताना ते अमृततुल्य वाणीतून बोध देत होते. कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात भक्तगण उपस्थित होते. ध्येय प्राप्तीसाठी इच्छाशक्ती व नामाची जोड आवश्यक आहे. ईश्वर प्राप्तीसाठी कर्म मार्ग ,ज्ञान मार्ग, भक्ती मार्ग ही तीन मार्गे आहेत. त्यात सर्वात सोपा मार्ग म्हणजे भक्ती मार्ग आहे. चांगली संकल्पना ठेवून भक्तिमार्ग अवलंबवला तर निश्चित ईश्वर प्राप्ती साठी वेळ लागत नाही. भक्ती मार्गामुळे अनुसयाच्या पोटी ईश्वराला अवतार घ्यावा लागला .भक्ती मध्ये फार मोठी शक्ती आहे .असे आचार्य कथेतून विचार व्यक्त केले कर्मा मार्गात बदल होऊ शकतो तर ज्ञानमार्गात अहंकार विमान होऊ शकतो मात्र भक्तिमार्गात कुठलाही अहंकार राहत नाही
Post a Comment