मेहबूब नगरातील मूलभूत समस्या मार्गी लावा
वंचित बहुजन आघाडीचे नगर परिषद मुख्याधिकारी यांना निवेदन
l खामगाव प्रतिनिधी: स्थानिक
मेहबुब नगर ला जाणाऱ्या पुलाची दुरावस्था व कचऱ्यामुळे नाल्याचे पाणी नागरिकांच्या घरामध्ये शिरत आहे तसेच नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे या मूलभूत समस्या मार्गी लावण्यासाठी वंचीत बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष गणेश चौकसे यांच्या नेतृत्वात शुक्रवारी नगर परिषद मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले. सदर निवेदनात नमूद करण्यात आले आहे की,
स्थानिक मेहबुब नगर व चांदमारी चौक तसेच खेडकर नगर ला जोडणाऱ्या पुलाचे खाली मोठ्या प्रमाणात कचरा जमा झाल्यामुळे नाल्याचे पाणी परिसरात घुसून सर्वीकडे दुर्गंध निर्माण झालेली आहे त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. घाणीमुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्याला धोका निर्माण होत आहे. त्यामुळे डेंग्यु ताप, अनेक स्किन इन्फेक्शन, डोळ्याचे आजार निर्माण झालेले आहेत तसेच विद्यार्थ्यांना शाळेमध्ये ये-जा करण्यास मोठा त्रास होत आहे. वास्तविक पाहता नगर परिषद प्रशासन हे नियमित नागरिकांकडून सर्व प्रकारचे टॅक्स घेते व दलित वस्तीच्या नावाखाली कोट्यावधी रुपये खर्च करण्यात येतात, परंतु मुलभूत सुविधा पुरविण्यात येत नाही. नागरिकांना मुलभूत सुविधा देणे हे नगर परिषदेचे कर्तव्य आहे परंतु तसे न करता केवळ टॅक्स वसुली अनेक वर्षापासून करण्यात येत आहे. तरी मेहबूब नगर, चांदमारी फैल संपुर्ण परिसरात साफसफाई करुन त्वरीत १५ दिवसाचे आंत पुलाची दुरुस्ती करण्यात यावी. अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने परिसरातील संपुर्ण कचरा व घाण पाणी नगर परिषद मध्ये टाकण्यात येईल त्यानंतर उद्भवणाऱ्या संपुर्ण परिस्थितीला नगर परिषद प्रशासन जबाबदार राहील असा इशारा देण्यात आला आहे. या निवेदनावर जिल्हाध्यक्ष गणेश चौकसे, बाजार समिती उपसभापती संघपाल जाधव, मो. सईद गु. सादिक, हबीब खान मुस्लिम खा, आसिफ इकबाल अब्दुल नबी, अब्दुल आयाज अ. बर, मो. साबीर मो.हनीफ, माजीद खान, शेख अनिस, अमजद खान, आबिद खान हनीफ खान, अरबाज खान, मो. अमीन यांच्यासह इतर नागरीकांच्या सह्या आहेत.l फोटो -
Post a Comment