एनके कॉलेज ऑफ फार्मसी चा उत्कृष्ट निकाल
जनोपचार न्यूज नेटवर्क:- औषधनिर्माणशास्त्र शिक्षण क्षेत्रात अग्रेसर असलेल्या अंत्रज, ता. खामगावयेथील एनके कॉलेज ऑफ फार्मसी ने महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबईकडून मे 2023 मध्ये घेण्यात आलेल्या वार्षिक निकालात भरारी घेत विद्यार्थ्यांनीघवघवीत यश प्राप्त केले आहे.
डी फार्म प्रथम वर्षात कु. अमृता नारायण मांडेकर हिने ७३.४० टक्के गुणप्राप्त करून महाविद्यालयात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे तसेच अकमलोद्दीन काझी या विद्यार्थ्याने ७३.०० टक्के गुण प्राप्त करून द्वितीय क्रमांक मिळवला व कु. रिया शामसुंदर गुरव हिने ७२.०० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. यावर्षी महाविद्यालयाचे प्रथम वर्ष असून विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन गवई यांनीदिली . संस्थेचे अध्यक्ष नरेशजी नागवानी, संस्थेचे सचिव सुनीलजी माळी,
प्राचार्य डॉ. नितीन गवई व शिक्षकवृंद यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून
त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Post a Comment