घाटपुरी नाका पाण्याच्या टाकीजवळ चालु असलेल्या जुगारावर छापा;
१० जणांकडून लाखावर मुद्येमाल जप्त
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क:- खामगाव शहर येथे पालखी बंदोबस्त कामी ब्रिफींग करीता हजर असतांना पोलीस उपअधिक्षक विवेक पाटील यांना गोपणीय माहीती मिळाल्यावरून पोलिसांनी घाटपुरी पाण्याचे टाकीजवळ सार्वजनीक जागेमध्ये ग्रिननेट आजुबाजूला छापा टाकलाअसता काही इसम लोकांना वरली मटक्याच्या अंकचिठयालिहुन देवुन त्यांचेकडुन पैसे स्विकारूण पैशाचे हारजित वर वरली मटका नावाचाजूगार खेळत व खेळवीत असल्याचे पोलिसांना दिसले. त्यामुळे पोलिसांनी छापा टाकला असता पंकज ऊर्फ विकी नारायण चौधरी वय 37 वर्ष रा. शिवाजी वेस खामगाव 2)अमित मधुकर जाधव वय 35 वर्ष रा. सुटाळपुरा, खामगाव 3) कपील सहदेव वानखडे वय 30 वर्ष रा. जूनेगाव घाटपुरी, खामगाव 4) संतोष काशिराम श्रिनाथ वय 41 वर्ष,रा.भोईपुरा खामगाव 5 ) रुपेश प्रकाश सुर्यवंशी वय 31 वर्ष, रा. भोईपुरा खामगाव 6)सूनील जगदेवराव गोडाळे वय 35 वर्ष, रा. राणा आखाडा जवळ खामगाव 7) वामणनारायण उंबरकार वय 50 वर्ष, रा. गोपाल नगर खामगाव 8) सुनील अशोक डाहे वय34 वर्ष गोपाल नगर खामगाव 9) अजय किसन बैरागी वय 22 वर्ष, रा. घाटपुरीखामगाव 10) अरुण नारायण शेटये वय 70 वर्ष रा. गोपाल नगर खामगाव यांना पकडुन
त्यांच्याकडुन नगदी जूगाराचे 45,390/- रुपये, डॉट पेन 09 नग कि. 45.00/- रुपये, एक लेटर पॅड कि.50/- रुपये, एक कॅलक्युलेटर कि. 100/- रुपये व मोबाईल एकूण 07 नग कि. 61,000/ रुपये असा एकुण 1,06,585/- रु चा मुद्येमाल हस्तगत करण्यात आला आहे.ही कार्यवाही श्री. सुनिल कडासने पोलीस अधिक्षक, बुलडाणा, श्री.अशोक थोरात अपर पोलीस अधिक्षक खामगांव, श्री विनोद ठाकरे उपविभागीयपोलीस अधिकारी, खामगांव यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. विवेक पाटील परि. पोलीस उपअधिक्षक पो. स्टे. शिवाजी नगर, खामगांव, श्री अरुण परदेशी ठाणेदार पो.स्टे.शिवाजी नगर, पोउपनि विनोद खांबलकर, पोहेकाँ/909 निलसिंग चव्हाण, नापोकाँ895
देवेंद्र शेळेक, नापोकाँ/881 संदीप टाकसाळ, नापोकाँ/832 संतोष वाघ, चालक
नापोकाँ/539 नितीन भालेराव, पोकाँ / 2676 प्रविण गायकवाड व चालक पोकाँ/ 1790भगवान खोसे पो.स्टे. शिवाजी नगर, खामगांव व दंगा नियत्रंण पथक, खामगांव यांनीकेलेली आहे.
Post a Comment